Home मराठवाडा कोरोनाच्या संकटात स्वत:ला झोकून देत गरिबांच्या मदतीला धावून जाणारा बेताज बादशहा –...

कोरोनाच्या संकटात स्वत:ला झोकून देत गरिबांच्या मदतीला धावून जाणारा बेताज बादशहा – रमेशआण्णा मुळे

41
0

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना – कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या वतीने संपूर्ण देशभरात लाॅकडाउन करण्यात आले आहे. कोरोनाने जगभरात कहर माजविला आहे. जगात जीवनावश्यक असे काहीच नाही तर जीवनच आवश्यक आहे.स्वत:च्या जीवापेक्षा सत्ता,संपत्ती या गोष्टी गौण आहेत.याचा प्रत्यय आल्याने दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी राजकिय पुढारी,गडगंज संपतीत लोळणारे लोक बिळात लपून बसले आहेत.मात्र औरंगाबाद , बुलढाणा सारख्या रेडझोन एरियात घराबाहेर पडत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गोरगरिबांना मदत, अन्नछत्र उभे करून मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रिदवाक्य प्रत्यक्षात उतरविणारे औरंगाबाद येथील रमेशआण्णा मुळे यांच्या धाडशी व्यक्तिमत्त्वाचे, दानशूरतेचे मराठवाड्यात कौतुक केले जात आहे. समाजात काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात,काही माणसे गरिबीला गुलाम बनवतात मात्र जी माणसे माणूष्कीला प्रणाम करतात तेच इतिहास घडवतात.कोरोनाच्या संकटात रमेशआण्णा मुळे यांनी मुळे फाउंडेशनच्या वतीने औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने २८ लाख रूपयांपेक्षा जास्त जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे वाटप केले आहे. पोलिस, आरोग्य विभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना तसेच असंख्य लोकांना मास्क,सॅनिटायझर, वाटप केले.केंद्रिय रावसाहेब दानवे, डॉ.उपाध्याय, बबनराव पेरे पाटील,गणपती राजुरचे खरातमामा जालन्याचे परशुराम पवार यांनीही रमेश आण्णा मुळे यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आहे.

Unlimited Reseller Hosting