Home सातारा अनफळकरांवर पाणी टंचाईचे संकट , “कोरोनात पाण्यासाठी होतीय गर्दी”

अनफळकरांवर पाणी टंचाईचे संकट , “कोरोनात पाण्यासाठी होतीय गर्दी”

581

प्रशासन काय भूमिका घेणार,ग्रामपंचायतीचा टँकर मागणीचा प्रस्ताव…

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना सारख्या महाभयंकर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून सरकार त्यांच्या पद्धतीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे तर एकीकडे कोरणा चे संकट तर दुसरीकडे पाण्यासाठी अनफळकरांची सुरू झालेली वणवण व पाण्यासाठी होऊ लागलेली सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळील गर्दी यावर प्रशासन काय भूमिका घेणार , याकडे लक्ष लागून राहिले आहे.
अनफळे हे मायणीपासून चार पाच किलोमीटर अंतरावर असलेले छोटेसे गाव. सध्या या गावातील खंडोबा मंदिर येथे एका बोअरवेलच्या आधारे अनफळकर आपली पाण्याची तहान भागवत आहेत.पण संपूर्ण गावामध्ये पाण्याचा एकच बोअरवेल असल्याने त्याचे ही पाणी कमी झाल्याने हा एक होल अनफळकरांची तहान भागवू शकत नसल्याने पाण्यासाठी येथील लोकांना भटकंती करावी लागत आहे.तसेच पिण्याच्या पाण्याच्या एका हंड्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.
दरवर्षी डिसेंबर संपला की पाण्याची पातळी हळूहळू कमी होत जाते.पातळी कमी झाल्याने पाण्यासाठी जानेवारीपासूनच लोकांना भटकंती करावी लागते.पण गत वर्षी चांगला पाऊस झाल्याने भूजल पातळी एप्रिल महिना अखेर प्रमाणात टिकून होती. परंतु गेल्या महिन्यात पासून पाण्याची पातळी कमी झाल्याने अनफळकरांसाठी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे . यासंबंधीचा प्रस्ताव अनफळे ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे पाठवला आहे . याकडे तातडीने लक्ष देऊन सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनफळकराना टँकरची उपलब्धता करून देने गरजेचे आहे.