Home विदर्भ 9 मे रोजी शिवशक्ती लॉन यवतमाळ येथे महारक्तदान शिवीराचे आयोजन….

9 मे रोजी शिवशक्ती लॉन यवतमाळ येथे महारक्तदान शिवीराचे आयोजन….

147

यवतमाळ – कोरोना संसर्ग – 19 महामारीमुळे यवतमाळ शहरातील शासकीय रुग्णालय व अनेक खाजगी रुग्णालयात रुग्णांकरिता रक्ताची आवश्यकता असून यवतमाळ शहरातील विविध सामाजिक संघटना व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 9 मे रोजी सकाळी 8 ते 12 पर्यंत शिवशक्ती लॉन स्टेट बँक चौक यवतमाळ येथे महारक्त शिवीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिवीराचे मुख्य संयोजक शैलेश करिहार यांच्या मार्गदर्शनात ह्या भव्य महारक्तदान शिवीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या महारक्तदान शिवीरात रक्तदात्यांनी स्व प्रेरणेने येऊन सोशल डिस्टेसिंगचा पालन करीत रक्तदान शिवीरात सहभागी व्हावे असे आवाहन महारक्तदान शिवीराचे संयोजक शैलेश करिहार संचालक एस. के. ऑटोडिल मास्क क्रिएटीव्ह कल्चरल क्लब बाळा सज्जनवार, श्री हनुमान मंदीर समितीचे सुर्यकांत मुराई, जयहिंद दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष पवन अराडे, यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशनचे अध्यक्ष विवेक अर्गुलवार, इनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ ज्वेल्स अध्यक्षा रितु गायकवाड, सोनार सेवा महासंघाचे प्रशांत गोडे तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर समर्पण ग्रुप यांनी केले आहेत. या महारक्तदान शिवीराकरिता नांव नोंदणी करिता वरील सदस्यांकडे तसेच महारक्तदान शिवीराचे संयोजक शैलेश करिहार 9822567899, प्रसिद्धी प्रमुख विजय कुमार बुंदेला 8208374264, अनिरुद्ध झाडगावकर 9850406088, रविंद्र ढगे 9881448088 या वाट्सऍप नंबर वर आपले नांव नोंदवावे असे आवाहन महारक्तदान शिवीर समितीने केले आहे. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सतीश राठोड यांनी कळविले आहे.