Home जळगाव रमजान महिना व ईद होई पर्यन्त शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवा –...

रमजान महिना व ईद होई पर्यन्त शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवा – तहसीलदारांना निवेदन.

73
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – जिल्ह्यातील बोदवड येथे तहसीलदारांना निवेदन , देशासह महाराष्ट्रात Covid 19(कोरोना) ने जागतिक थैमान घातले असून महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रूग्णांच्या संखेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे. ही बाब लक्षात घेता बोदवड येथील मुस्लिम समाजाच्या वतीने बोदवड शहरातील सर्व बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात यावे असे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
निवेदनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या संकटातून राज्याच्या जनतेला वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे व दुर्दयवाने आपल्या जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील काही ठिकाण हॉटस्पॉट झोन मधे आलेले आहे त्या मुळे रमजान महिना व ईद निमित्ताने जर बोदवड शहरामधे कापड दुकान बुट चप्पल शॉपिंग सेंटर ,कॉस्मेटिक ,बांगड्या ,ची दुकाने, आठवडे बाजार चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास या दुकानात अथवा बाजारपेठेत मुस्लिम समाज बांधवांची गर्दी होऊ शकते व त्या मुळे सोशल डिस्टेंटसिंग (Social distancing ) राहणार नाही त्याचे पालन होणार नाही व गर्दीत एखादा कोरोना बाधीत रुग्ण असल्यास बोदवड शहर आटोक्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण 80 % रूग्ण असे आहेत की त्यांना लक्षणे दिसत नाही परंतु ते पॉझिटीव्ह निघालेले आहेत. रमजान ईद पुढच्या वर्षी पुन्हा येईल परंतु एकदा गेलेले जिवन पुन्हा येणार नाही म्हणून जनतेच्या व देशाच्या हीता साठी रमजान ईद होई पर्यन्त बोदवड शहरातील बाजारपेठ उघडण्यासाठी परवानगी देऊ नये, ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतिने हाथ जोडुन कळकळीची विनंती आहे.
अश्या मंगणीचे निवेदन तहसीलदार रविंद्र जोगी यांना देऊन निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, आमदार चंद्रकांत पाटील,मुख्यधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनावर जाफर मण्यार, नहिम खान बागवान,समीर शेख, समीर पिंजारी यांच्या स्वाक्षऱ्या आहे.