Home राष्ट्रीय जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये ४८ तासात दुसरा दहशतवादी हल्ला , ३ जवान शहीद ७...

जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये ४८ तासात दुसरा दहशतवादी हल्ला , ३ जवान शहीद ७ जवान जखमी

55
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

जम्मू काश्मीर च्या हंदवाडा जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी संरक्षण दलावर हल्ला केला. हंदवाडा मधील काझियाबाद परिसरत सीआरपीएफ च्या एका गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

या हल्ल्यात सीआरपीएफचे ३ जवान शहीद झाले असून सात जवान जखमी झाले आहे. चकमकी दरम्यान सीआरपीएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे.
दहशतवाद्यांनी सोमवारी संध्याकाळी काझियाबादमध्ये गस्तीसाठी जात असलेल्या सीआरपीएफच्या एका पथकावर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. मात्र या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सात जवान जखमी झाले असल्याची माहिती सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

*कुपवाड्यात हाय अलर्ट*

घटनेची माहिती मिळताच करालगुंड, काझियाबाद आणि नौगाम या परिसरात लष्करानं मोठी शोध मोहिम सुरू केली. यामध्ये राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी ही सहभाग घेतला आहे. दोन मोठ्या दहशतवादी कारवायां नंतर लष्कराच्या स्पेशल फोर्स आणि राष्ट्रीय रायफल्सच्या काही टीमनं कुपवाड्यात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे.

*शनिवारी ही हल्ला*

जम्मु काश्मीर मध्ये कुपवारा सेक्टर मध्ये असलेल्या हांडवरा गावात अतिरेक्यांनी घुसखोरी केली. त्यानंतर भारतीय लष्कर आणि अतिरेक्यांच्या झालेल्या चकमकी मध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्या जवानांना यश आले होते मात्र यामध्ये भारतीय लष्कराचे १ कर्नल, १ मेजर, २ जवान आणि जम्मु काश्मीर पोलिस चा १ अधिकारी शहीद झाले.
सैन्याचे शहीद झालेले सर्व हे जवान राष्ट्रीय राइफ्ल्स चे सदस्य होते. शहीद झालेल्यांमध्ये युनिट चे कमांडींग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा (सेना मेडल), मेजर अनुज सूद, मेजर नाईक राजेश आणि लान्स नायक दिनेश हे होते तर जम्मु काश्मीर पोलिस सब इन्स्पेक्टर शकील काझी यांचा समावेश आहे.
कर्नल आशुतोष वर्मा हे अतिरेकी विरोधी मोहिमेत निपुण होते. त्यांना ह्या आधी २ वेळेस भारत सरकार कडून शौर्यासाठी गौरविण्यात आले होते. मेजर सूड हे सुद्धा अतिशय कर्तबगार आणि धाडसी व्यक्तिमत्व असलेले म्हणून परिचित होते.

*घटनाक्रम -*

गुप्तहेर खात्या कडून लष्कराला माहिती मिळाली होती की हंडवरा ह्या भागात लष्कर – ए – तैयबा चा म्होरक्या हैदर काही साथीदारांना सोबत घेऊन येणार आहे. त्या नुसार कर्नल वर्मा ह्यांनी सापळा रचला. अतिरेक्यांनी तेथे एका घरात आसरा घेऊन लोकांना बंधक घेतले. ही माहिती मिळताच लष्कराने कार्यवाही सुरू केली. त्यांनी घरा घरात जाऊन शोध मोहीम राबवली. आणि सोबतच तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढत राहिले. अश्याच एका घरात गेलेले असताना तेथे लपलेल्या अतिरेक्यांनी बंधकांच्या आडोशाने त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला ज्या मध्ये हे ५ ही जान जखमी झाले. परंतु त्यांनी प्रतिकार करणे सुरू ठेवले आणि त्यात २ अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात त्यांना यश आले. त्यातच ह्या पाचही जणांना वीरमरण आले. देशासाठी वीरमरण पावलेल्या शूर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.