Home सातारा कोरोनाच्या लढाईतील कर्मचार्‍यांना शहिदांचा दर्जा द्यावा…!

कोरोनाच्या लढाईतील कर्मचार्‍यांना शहिदांचा दर्जा द्यावा…!

85
0

अखिल भारतीय युवक महांसघाचे केंद्रीय प्रतिनिधी दशरथ द. पिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…!!

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – कोरोना विषाणुच्या प्रतिबंधानत्मक जर दुर्देवाने कर्तव्य बजावणार्‍या डॉक्टर्स नर्स पोलिस कर्मचारी, शासकीय कर्मचारी, सुरक्षारक्षक यांना कोरोनाची लागण होऊन मृत्यु झाला तर त्यांना इतर मदती बरोबरच सैनिकाप्रमाणे दर्जा द्यावा अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे करावी अशी मागणी अखिल भारतीय युवक महांसघाचे केंद्रीय प्रतिनिधी दशरथ द. पिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सध्या स्थितीत कोरोनाच्या विषाणुने सर्व जगाला व्यापले आहे. त्याच प्रमाणात देशात व महाराष्ट्र राज्यात देखील कोरोना रुग्णांचा आकडा वाढु लागला आहे.भारत देशात सर्वाधिक महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे रुग्ण आहेत.या रोगाचे विषाणु वाढु नयेत म्हणुन राज्य सरकार व अारोग्य विभागातील डाॅक्टर नर्स पोलीस विभाग तसेच अनेक स्वयंसेवी संस्था आपल्या जिवाची पर्वा न करता या परिस्थितीशी लढत आहेत.
अशा पद्धतीने लढताना मुंबई पोलीस विभागातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचा देखील कोरोनाने मृत्यु झाला आहे.तरी त्या पोलीस कर्मचार्‍यांना शहिदांचा दर्जा देवुन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तात्काळ केली पाहिजे.तसेच पी.एम.व सी.एम फंडाच्या धर्तीवरच या कर्मचार्‍यांना वेगळया मदत निधीच्या माध्यमातुन नागरिकांतुन फंड उभा किंवा नागरिकांना देखील यांना मदत करता यावी असे नियोजन करावे अशी मागणी
केली आहे.