Home विदर्भ मुर्तीजापूरात ट्रकचालक युवकाची दगडाने ठेचून हत्या

मुर्तीजापूरात ट्रकचालक युवकाची दगडाने ठेचून हत्या

51
0

समीर अहेमद शेख

अकोला / मूर्तिजापूर – येथील देवरण रोड मोहम्मदीया प्लॉट परीसरातील शेत शिवारात ट्रक चालक असलेल्या २६ वर्षीय युवकाचा ४ मे च्या मध्यरात्री दुपट्ट्याने गळा आवळून तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवार, ५ मे रोजी उघडकीस आली. शेख वसीम शेख कलीम असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.
खडकपूरा भागात राहणारा शेख वसीम शेख कलीम (२६) हा ट्रक चालक म्हणून काम करीत होता. घटनेच्या दिवशी सोमवारी संध्याकाळी तो ट्रक घेऊन घरी पोहोचला. रात्री आठ वाजता जेवण करुन घराबाहेर पडला. रात्रभर घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. दरम्यान, मंगळवारी सकाळी देवरण रोडवरील मोहम्मदीया प्लॉटला लागून असलेल्या शेत शिवारात त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. गळ्याला दुप्पटा आवळेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह दिसून आल्याने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असला तरी चेहरा दगडाने ठेचून छिन्नविछिन्न केलेला आहे. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, शहर ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, दिपक इंगळे घटनास्थळी पोहचले असून, पुढील तपास सुरु आहे.