Home महत्वाची बातमी सत्तर हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करणार , राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,

सत्तर हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करणार , राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,

65
0

अमीन शाह

औरंगाबादः कोरोनाचे वाढते संकट आणि धोका पाहता राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड- सोयगांव मतदारसंघात ‘डॉक्टर आपल्या दारी ही योजना़’ सुरु केली आहे. सिल्लोड नगरपालिकेच्या माध्यामातून पहिल्या टप्यात ही योजना सिल्लोड शहरातील १३ प्रभागांमध्ये राबविण्यात येणार आहे. आजपासून या योजनेचा शुभारंभ पोलीस, नगरपालिकेचे कर्मचारी आदींचे स्क्रीनिंग करून करण्यात आला. शहरातील तब्बल सत्तर हजार नागरिकांची आरोग्य तपासणी या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. ही योजना राबवणारी सिल्लोड नगरपालिका ही राज्यातील पहिली नगरपालिका असल्याचा दावा देखील केला जातोय.

देशात व राज्यात कोरोनाचे संकट वाढल्यापासून सगळ्याच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात थांबून लोकांमध्ये जनतागृती करत आहे. सिल्लोन नगरपालिकेच्या माध्यमातून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील विविध उपक्रम राबवले. मोफत अन्नधान्य, सॅनिटायजर, साबण, गरजूंना अन्न पाकीटे आदी उपक्रम लॉकाडाऊन लागू केल्यापासून सुरू आहे. आता त्यापुढे एक पाऊल टाकत सत्तार यांच्या मार्गदर्शन खाली सिल्लोड नगरपालिकेने डॉक्टर आपल्या दारी ही नवी योजना आणली आहे.
कोरोनाच्या सावटाखाली वावरत असलेल्या सर्वसामान्यांच्या मनातील भिती घालवण्यासाठी तसेच त्यांची तपासणी करून शहराला कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. शहरातील तेरा प्रभांगामध्ये प्रत्येक घरात जाऊन सर्दी, खोकला, ताप आदी तक्रारी असलेल्या नागरिकांची डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. जर कुणाला कोरोनाची लक्षण आढळलीच तर त्यांना पुढील तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे.
नगरपालिकेने उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका कर्मचारी, धन्वतंरी डॉक्टर असोसिएशन यांच्यासह प्रत्येक प्रभागासाठी दोन असे २६ पथक तयार केले आहेत. यात नगरपालिकेतील नगरसेवकांचा देखील समावेश असणार आहे. हे पथक दररोज शहरातील प्रत्येक प्रभागातील घरात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत.
शहरात हा प्रयोग यशस्ववी झाल्यानंतर दुसऱ्या टप्यात ग्रामीण भागातील लोकांची देखील आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे सत्तार यांनी सागंतिले. लोकांच्या मनातील भिती काढून त्यांना आपल्या आजुबाजूला कुणी बाहेरची व्यक्ती आली तर त्याची माहिती पोलीस, प्रशासनाला देऊन आपले घर आणि शहर कोरोनामुक्त ठेवावे असे आवाहन देखील सत्तार यांनी केले आहे.