Home विदर्भ आर्वी उपविभागातून पहिली खेप उत्तर प्रदेशकडे रवाना

आर्वी उपविभागातून पहिली खेप उत्तर प्रदेशकडे रवाना

79
0

टाळाबंदीमुळे अडकलेल्या २४ मजुरांचा यात समावेश, चहऱ्यावर फुलले होते हास्य.

वर्धा – जिल्हा आर्वी व आष्टि तालुका येथील उपविभागात टाळाबंदीमुळे अडकलेल्या २४ स्थलांतरीत मजूराची पहिली खेप उत्तर प्रदेश कडे रवाना करण्यात आली असून यावेळी त्यांच्या चहऱ्यावर सुटकेचा भाव दिसून आला तर चेहऱ्यावर हास्य फुलले होते. आज येथील बस स्थानकावरून निघालेल्या या मजुरांना उपविभागीय अधिकारी हरिष धार्मीक, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे, ठाणेदार संपत चव्हाण, तहसिलदार विध्यासागर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले यांनी टाळ्याच्या गजरात निरोप दिला.
यात उत्तर प्रदेशच्या अलीगड, अटरोली, उन्नाव, कानपुर, , चित्रकुट, गाजीपुर, बलीया आणी बाराबंकी या जिल्ह्याचा समावेश आहे या शिवाय आष्टी तालूक्यातील १० मजुरांचा यात समावेश आहे.
महामार्गाच्या बांधकामा करीता आलेले हे मजुर टाळाबंदीमुळे अडकलेले होते. मागील सात महिण्यापासून घरच तोंड पायला मिळाला नव्हता अशातच संचारबंदीच्या काळात त्यांचेवर उपासमारीची वेळ आली होती.
अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थालांतरीत मजुरांना व विध्यार्थ्यांना आपआपल्या राज्यात जाण्याची मुभा दिली. यामुळे त्यांना दिलासा मिळाला. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या व राज्य शासनाच्या निर्देशापासुन शुक्रवार पासुन ऑनलाईन नोंदणी सुरू झाली. आर्वी उपविभागातील २४ मजुरांची पहिली खेप नागपुर रेल्वे स्टेशनवरून उत्तर प्रदेशकडे पहिली ट्रेन रवाना होणार आहे हे स्थालांतरीत मजुर या ट्रेनने आपलया गावाकडे पाठवल्या जाणार आहे .

हरीष धार्मिक (उपविभागिय अधिकारी)