मुंबई

अन्न पुरवठा विभागाचे सचिव महेश पाठक यांची रेशन बाबत तक्रार कराल तर खंडणीचा गून्हा दाखल करण्याची पत्रकार वाघमारेंना धमकी , विविध संघटनेकडून जाहिर निषेध – सी बी आय मार्फत चौकशीची मागणी….!

मुंबई – प्रतिनिधी

मुंबई – राठोडी गावं येथील रेशन दुकान ४२ग १९४ मध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल बेजाबदार वक्तव्य करणारे रेशन निरीक्षक अभिजित बोरोडे कारवाई कधी याबाबत प्रसार प्रसार माध्यमामध्ये बातम्या दिल्यामुळं राज्याचे अन्न पुरवठा विभागाचे उच्च अधिकारी महेश पाठक यांनी व्हाट्सप वर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली सविस्तर वृत्त असे की दिनांक १९ /४/२०२० रोजी नीलिमा को ऑप सोसायटी येथील दुकान क्रमांक ४२ ग १९४ रेशन नाकारले बाबत व अधिकारी अभिजित बोरोडे नीं तुम्ही तुमचं बघा लोकांचं नका सांगू मला आणि तुम्ही केलेली तक्रार माघे घ्या असे दरडावत प्रकरणी वर्तमान पत्रामध्ये यु ट्यूब चॅनल वेब पोर्टल मध्ये आलेल्या बातम्या अन्न पुरवठा विभागाचे उच्च अधिकारी यांना व्हाट्सप द्वारे अवगत केल्या वर अधिकारी ची चौकशी न करता मलाच तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणून एकप्रकारे धमकावत सदर अधिकारी बोरोडे ची पाठराखण करीत मला दाबण्याचा कुटील डाव दिसून येतो लोकशाहीचा चौथा स्थंभ पत्रकार या नात्याने मी सरकारी मोफत तांदूळ नाकारला आणि विभागात खूप लोकांच्या तक्रारी चा विचार करून या बाबत सतर्क नागरिक म्हणून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला यामध्ये सदर दुकानावर निलंबनाची कारवाई झाली असे उपनियंत्रक कांदिवली विभाग चे सुहास शेवाळे यांनी कळविले मात्र बेजबाबदार पणे तुम्ही तुमचे बघा दुसऱ्याचं नका सांगू आणि दुकानदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्यां बद्दल वर्तमान पत्रामध्ये बातमी दिली या रेशन दुकानदार बद्दल आणि बोरोडे बद्दलचे लोकांना रेशन मिळत नाही याबद्दलचे व्हिडीओ बातम्या पाठक याना संबंधित खात्याचे अधिकारी या नात्याने माहिती साठी पाठविले तेंव्हां कधीच काही प्रतिक्रिया दिली नाही मात्र अधिकारी बोरोडे वर कारवाई ची कधी ची बातमी पाठवताच उत्तर दिले हे ठीक नाही करत तुम्ही अश्या बातम्या देऊ नका म्हणून तुम्हाला खंडणी मध्ये अडकवू असे स्पस्ट पणे महेश पाठक यांच्या बोलण्याचा हेतू दिसून येतो यामुळे कुठेतरी पाणी मुरतंय या काळाबाजार विरुद्ध आवाज उठविल्यामुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झाला आहे याबाबत चौकशी करून बेजाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि या रेशन आधिकारी व दुकानदार यांच्या काळ्याबाजाराची सि बी आय मार्फत चौकशी व्हावी व धमकी बाबत सुरेश वाघमारे यांनी मालवणी पोलीस ठाणे मध्ये लेखी तक्रार दिली असून मुख्यमंत्री गृहमंत्री अन्न पुरवठा मंत्री राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू मुंबई पोलीस आदींना ट्विटर द्वारे तक्रार दिली आहे व आजमी नगर येथील दिलेलं दुकान राठोडी वासियांना ये जा करण्यास परवडणारे नसून राठोडी गावं जवळील ठिकाणी रेशनची सुविधा उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहेत अधिकाऱयाने नागरिकांची मागणी मान्य करावी व जनतेस रेशन दुकानावर मोफत आलेले तांदूळ व रेशन मिळावे ही माझ्यासह सर्वसामान्य जनतेची मागणी आहे असे सुरेश वाघमारे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले अश्या प्रकारे बेजबाबदार अधिकारी अभिजित बोरोडे यांना उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी पाठीशी घालत व्हाट्सप द्वारे लोकशाहीचा गळा घोटण्याचे प्रकार थांबवावेत अन्यथा या विरुद्ध लॉकडाऊन संपल्यावर विविध संघटनेच्या वतीने निषेध मोर्चे काढण्यात येईल असे फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप , रिपब्लिकन विध्यार्थी सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष गाडे , बहुजन अन्याय अत्याचार कृती समितीचे प्रमुख श्याम झळके , नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्यसचिव वैभव गीते , अस्मिता महिला संघाच्या स्नेहा पवार , प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे महाराष्ट्र महासचिव रामदास खोत , संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आगतराव आवटे , प्रहार जनशक्ती पक्ष पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव , मराठी भाषीक संघटनेचे सुरेश धासरे , जय लहूजी नवनिर्माण सेनेचे प्रकाश सूर्यवंशी , रिपाई आठवले गट चे वार्ड अध्यक्ष राजेश साळवे , वंचित बहुजन आघाडीचे मछिंद्र चीं माने , मिलिंद लिंगायत , राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष दादाभाऊ माने , ब्ल्यूबर्ड फाउंडेशन चे प्रमुख कैलास आखाडे , केंद्रीय पत्रकार संघाचे प्रमुख संदीप कशाळकर , पत्रकार संरक्षण समितीचे प्रमुख विनोद पत्रे , बहुजन विकास आघाडीचे चारकोप , विधानसभा अध्यक्ष राजेश मंजाळ , जीवन ज्योत सामाजिक संस्थेचे प्रमुख रवी गवळी , नवनिर्माण पत्रकार संघाचे रवींद्र आढाव , कांदिवली टाइम्स चे संपादक आशिष सिह , सिद्धार्थ काळे महाराष्ट्र चित्रपट संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील कांगे , भारतीय बौद्ध महासभा जनहित मानवाधिकार मराठवाडा प्रभारी ऍड सुरेश काळे , सोलापूर जनहित मानवाधिकार च्या माधुरीताई कांबळे बबिता काळे , भारतीय जनता पार्टी आदिवासी विभाग मुंबई अध्यक्ष प्रवीण धोडीया , महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपचिटणीस संजय सरोदे , धम्मानन्द शिंदे आदींसह अन्य संघटना लेखी पत्रं कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना देणार असून सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहेत .

१ मे रोजी घरातच पुकारलेल्या अन्न त्याग आंदोलन मालवणी पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने तूर्तास पुढे ढकलण्यात आले , असल्याचे वाघमारे यांनी कळविले आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

मुंबई

सिद्धी टेलिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरजित सिंग यांच्या नावावरुन फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट

लियाकत शाह मुंबई – शिवानी शर्मा नावाच्या महिलेने सिद्धी टेलिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरजित सिंग ...
मुंबई

फाईट फॉर राईट फाउंडेशन ने केली अदानी इलेक्ट्रीसिटी च्या वीज बिलांची होळी…!

मुंबई – सुरेश वाघमारे लॉकडाऊन दरम्यान अन्यायकारक वीजबिले पाठवून जनतेची पिळवणूक करणाऱ्या अदानी इलेक्ट्रीसिटी विरुद्ध ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *