Home जळगाव ईकरा कैम्पस शिरसोली रोड मधे 350 कोरोन्टाइन रूग्णांची व्यवस्था होणार

ईकरा कैम्पस शिरसोली रोड मधे 350 कोरोन्टाइन रूग्णांची व्यवस्था होणार

77
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्हयात कोरोना संक्रमित रूग्णांची वाढती संख्या पाहता ईकरा शिक्षण संस्था जळगाव संचलित ईकरा यूनानी काॅलेज व ईकरा निवासी शाळेत तीनशे पन्नास रुग्णा साठी अधिग्रहत केले आहे. शंभर बेड काॅलेज हास्पीटल मधे व दोनशे पन्नास बेड निवासी शाळे मधे रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. ।हाॅस्पीटल ला सेनीटाइजेशन ची फवारणी करून इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्या चे काम युध्द पातळी वर सुरु आहे।या वेळी कैम्पस मधे मा अपर जिलाधिकारी श्री डॉ नंदकुमार बेडसे,जळगाव म न प आयुक्त सतीश कुलकर्णी ,उपायुक्त कपिल पवार,प्रांत अधिकारी सौ दीपमाला चवरे,संस्थे चे अध्यक्ष करीम सालार,डाॅ इकबाल शाह,प्राचार्य डाॅ कूद्दूस,उप प्राचार्य डाॅ शोएब,अफजल शेख व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता। आपल्या देशा वरील संकट व आपले जिल्हयातील रूग्णांची सोय व्हावी व प्रशासनाला सहकाय॔ व मानवते च्या दृष्टिकोन समोर ठेऊन संस्थे ने हास्पीटल व शाळे ची जागा उपलब्ध करून दिलेली आहे असे विचार ईकरा चे अध्यक्ष करीम सालार यांनी व्यक्त केले. आमचे हास्पीटल चे डाॅक्टर व स्टाफ यांचे सुध्दा सहकाय॔ रूग्णांना राहणार आहे असे ही त्यांनी सांगितले.