Home महाराष्ट्र राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 9318, दिवसभरात 31 जणांचा मृत्यू तर पुण्याचा आकडा हजारच्या...

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 9318, दिवसभरात 31 जणांचा मृत्यू तर पुण्याचा आकडा हजारच्या वर

125
0

विशेष प्रतिनिधी – राजेश भांगे

मुंबई – राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 9318 वर पोहोचली आहे. आज एका दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 729 ने वाढला आहे. तर दिवसभरात 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईची रुग्ण संख्या सहा हजारावर गेली असून पुण्यात देखील कोरोनाबाधितांचा आकडा हजारावर गेला आहे.

राज्यात आज कोरोनाच्या 729 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 9318 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 25 जण मुंबईचे तर पुण्यातील 2 आणि जळगाव येथील प्रत्येकी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 400 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 106 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 29 हजार 931 नमुन्यांपैकी 1 लाख 20 हजार 136 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 9318 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 55 हजार 170 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 9917 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 1388 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरूष तर 15 महिला आहेत. त्यातील 20 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 10 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर एक रुग्ण 40 वर्षांखालील आहे. 31 रुग्णांपैकी 20 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 9318

मृत्यू – 400

मुंबई महानगरपालिका- 6169 (मृत्यू 244)

ठाणे- 45 (मृत्यू 2 )

ठाणे महानगरपालिका- 344 (मृत्यू 4)

नवी मुंबई मनपा- 142(मृत्यू 3)

कल्याण डोंबिवली- 153 (मृत्यू 3)

उल्हासनगर मनपा – 3

भिवंडी, निजामपूर – 14

मिरा-भाईंदर- 123 (मृत्यू 2)

पालघर- 41 (मृत्यू 1 )

वसई- विरार- 123(मृत्यू 3)

रायगड- 22

पनवेल- 44 (मृत्यू 1)

नाशिक – 5

नाशिक मनपा- 19

मालेगाव मनपा – 171 (मृत्यू 12)

अहमदनगर- 26 (मृत्यू 2)

अहमदनगर मनपा – 16

धुळे – 8 (मृत्यू 2)

धुळे मनपा – 17 (मृत्यू 1)

जळगाव- 30 (मृत्यू 8)

जळगाव मनपा- 10 (मृत्यू 1)

नंदुरबार – 11 (मृत्यू 1)

पुणे- 58 (मृत्यू 3)

पुणे मनपा- 1044 (मृत्यू 76)

पिंपरी-चिंचवड मनपा- 72 (मृत्यू 3)

सातारा- 32 (मृत्यू 2)

सोलापूर- 7

सोलापूर मनपा- 75 (मृत्यू 5)

कोल्हापूर- 7

कोल्हापूर मनपा- 5

सांगली- 26

सांगली, मिरज, कुपवाड मनपा- 1 (मृत्यू 1)

सिंधुदुर्ग- 1

रत्नागिरी- 8 (मृत्यू 1)

औरंगाबाद -1

औरंगाबाद मनपा- 89 (मृत्यू 6)

जालना- 2

हिंगोली- 15

परभणी मनपा- 1

लातूर -12 (मृत्यू 1)

उस्मानाबाद-3

बीड – 1

नांदेड मनपा – 3

अकोला – 12 (मृत्यू 1)

अकोला मनपा- 22

अमरावती- 2

अमरावती मनपा- 26 (मृत्यू 7)

यवतमाळ- 71

बुलढाणा – 21 (मृत्यू 1)

वाशिम – 1

नागपूर- 4

नागपूर मनपा – 131 (मृत्यू 1)

भंडारा – 1

चंद्रपूर मनपा – 2

गोंदिया – 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 664 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 9061 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 38.30 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.