Home विदर्भ यवतमाळ “कोरोना” BREAKING…

यवतमाळ “कोरोना” BREAKING…

328
0

यवतमाळात आणखी एक पॉझेटिव्ह …एकूण संख्या ७६ वर…आयसोलेशन वॉर्डात ३१४ जण भरती…

संजय भोयर

यवतमाळ, दि. 29 :- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आणखी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 76 वर पोहचली आहे.
आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या नागरिकांची संख्या एकूण 314 झाली असून यापैकी 238 केसेस प्रिझेमटिव्ह आहे. गत 24 तासात आयसोलेशन वॉर्डात चार जण भरती झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 1148 नमुने तपासणीकरीता पाठविण्यात आले असून यापैकी 1125 रिपोर्ट आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. यात एकूण 1039 नमुने निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 150 तर गृह विलगीकरणात एकूण 884 जण आहेत.