Home विदर्भ कातखेड पंचायत च निर्णय गावठी दारूचे अड्डे दाखवा आणि 1 हजार रुपये...

कातखेड पंचायत च निर्णय गावठी दारूचे अड्डे दाखवा आणि 1 हजार रुपये बक्षीस मिळवा

242

कातखेड पंचायतनि दारू बंदीसाठी लढवली अनोखी शक्कल…

बार्शीटाकळी – पवन जाधव

अकोला – विदेशी दारूची आवक बंद झाल्यामुळे सध्या बार्शीटाकळी तालुक्‍यातील कातखेड येथे गावठी दारू गाळण्याचे प्रमाण वाढले आहे.असून बार्शीटाकळी पोलिसांनी 27 एप्रिल रोजी ठाणेदार तिरुपती राणे व बिट जमदार अरुण गावंडे किशोर पवार नागसेन वानखडे यांच्या सहकार्याने तब्बल पाच हातभट्ट्यांवर पोलिसांनि छापे टाकून तब्बल 24 हजाराचा मुद्देमाल व गावठी दारू जप्त केले.होते सर्वात जास्त कारवाई करणारे एकमेव ठाणेदार तिरुपती राणे यांनी केलं असता अशा चोरून लपून दारू गाळणाऱ्या विरोधात गावकरी समोर येऊन
28 एप्रिल रोजी गावातील पंचायत व सरपंच पोलीस पाटील आणि तरुण युवक मिळून गावातील दारूच्या अड्ड्यावर जाऊन अड्डे उडवस्त केलं त्याच बरोबर
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी गावातील सर्व रस्ते लॉकडाऊन करण्यात आलं मात्र बार्शीटाकळी तालुक्‍यातील कातखेड हे गाव अकोला लगत असल्याने अकोला शहरातून कोणीही तळीराम कातखेड येथे येऊ नये , यासाठी गावातील सरपंच गोरशिंग राठोड तंटामुक्ती अध्यक्ष समाधान चव्हाण पोलीस पाटील ज्योतिराम जाधव व तरुण युवक विशाल जाधव विजय राठोड सुनील राठोड ग्रा प कर्मचारी आणि त्यांचे सहकारी मिळून 27 एप्रिल रात्री 2 च्या सुमारास गावात अवैध दारू घेण्यासाठी आले असता त्या इसमान कडून गावठी दारू जप्त करण्यात आले डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत तरुण युवक व गावकरी त्याच बरोबर गावातील पंचायत कडून जो कोणी दारूचे अड्डे दाखवणार त्याना पंच कडून 1 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असे पंचायत नि सांगितले .

त्याचबरोबर लोकांना लॉकडाऊन पाळण्याचे आवाहनही केले जात असून कातखेड चे पोलीस पाटील ज्योतिराम जाधव मे मात्र नेहमीच दारू बंदीसाठी अग्रेसर असतात दादाराव पवार राजरत्न वानखडे पंजाब राठोड अशोक राठोड सुनील जाधव उल्हास राठोड सुरेश राठोड अक्षय राठोड अजय जाधव शैलेश राठोड पुंडलिक चव्हाण मोहन पवार देवेंद्र राठोड ऋषिकेश वानखडे दीपक राठोड आकाश पवार सोज्वल राठोड आणि इतर सहकारी होते. परिणामी कातखेड तेथून अकोला होणारी गावठी दारूची तस्करी कमी झाली आहे.