Home मराठवाडा वालुर येथील पत्रकारावर दाखल झालेला गुन्हा परत घेऊन जप्त केलेले मोबाईल परत...

वालुर येथील पत्रकारावर दाखल झालेला गुन्हा परत घेऊन जप्त केलेले मोबाईल परत देण्याची मागणी.

122
0

परभणी – सदर या प्रकरणी योग्य ती कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाचे आदेश आहे की कोणीही सोशल मीडियावर कोरोनाची अफवा किंवा जातीय तेड निर्माण करणारी पोस्ट केली तर प्रशासनच त्याची फिर्याद देवून योग्य ती करावी परंतु वालूर येथील प्रकरणात सेलू पोलिस प्रशासनाने पत्रकाराला फिर्यादी का केले?
दि.२८/०४/२०२० रोजी प्रकरण असे की दिनाक.०१/०४/२०२० बुधवार रोजी व वालुर ता. सेलु जि.परभणी येथील विद्यमान ग्रा. पं.सदस्याचा सुपुत्र गोपाळ सोनाजी अबुज याने मुस्लिम समाजाचे भावना दुःखवेल अशी पोस्ट फेसबुकवर शेयर केलती दोन समाजात तेढ निर्माण हो ऊ नये या उद्देशाने मी पत्रकार अन्वर पठान संपादक.tezznews24 , पञकार संरक्षण समिति संघटनेचे सेलु तालुका अध्यक्ष व माझा मित्र सोहेल पठाण यांनी ७५०७८६१९६० या नंबर ने एस.पी. ऑफिक परभणी व पी. आय. सेलू यांना या प्रकरणाची माहिती दिली व ट्विटरवर या संबंधीच्या पोस्टवर प्रशासनाने दखल घेण्याची विनंती केली होती.
परंतु त्यांना व त्यांच्या मित्राला रात्री १२ वाजता वालुर येथील बिटजमादर चौरे साहेब पोलीस चौकी येथे उचलून नेले व तेथूनच a p i अजय कुमार ल.पांडे यांनी रात्रीच‌ आम्हा दोघांना व संबंधित पोस्ट टाकानाऱ्याला सेलू पोलीस स्टेशन ला नेवुन बंद करून ठेवले सकाळी ८ वाजल्यास्या सुमारास धर्म सिंह राजपूत पो.का.क्र.१४२२ यांची डीवटि लागली व त्याने गुरुवार रोजी दिवशी त्या दोघांना मारहाण केली अपशब्द वापरले व शिवीगाळ केली. लोकशाहिचा चौथा आधार स्तंभ मानल्या जाणार्‍या पञकारांचे हे हाल होत असतिल तर आम जनते चे काय हाल होत असतिल .व त्या नंतर सेलू पी. आय. बोरगांवकर मॅडम याने त्यानंच्याकडून संबधितावर फिर्याद लिहून घेतली संबंधितावर भा.द.वी.कलम २९५(a) प्रमाणे गुनाह नोंद करण्यात आला. प्रशासनाचे आदेश आहे की कोणीही सोशल मीडियावर जातीय तेढ वा कोरोना संबंधी अफवा पसरवत असेल तर प्रशासनच त्यांची फिर्याद देऊन संबधितांविरुद्ध गुन्हा नोंद करतो परंतु सेलू पोलिस प्रशासनाने कोणाच्या दबावावर येऊन पत्रकरालाच एक रात्र व एक दिवस अटक केली व पत्रकराकडून फिर्याद लिहून घेतली ? त्या दोघांवर १०७ कलम प्रमाणे गुनाह नोंद करण्यात आला आहे.

पञकार व सामजिक कार्यकर्ता असल्याने दोन समाजा तेड निर्मान होउ नए या ऊद्देशाने त्यांनी हि तक्रार दाखल केली असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यांचे वर दाखल झालेला गुनाह परत घेवून जप्त केलेले मोबाईल परत देण्याची तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली असून कार्यवाही ना झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. हे निवेदन उपजिल्हाधिकारी सेलू मार्फत गृहमंत्री महाराष्ट्र राज्य , पोलिस महानिरीक्षक , महाराष्ट्र राज्य व पोलिस अधीक्षक यांना दि.28/04/2020 रोजी देण्यात आले आहे.