Home विदर्भ हिगणघाट तालुक्यातील कानगाव परिसरात भुकंप सदृश्य स्वरूपाचे झटके.

हिगणघाट तालुक्यातील कानगाव परिसरात भुकंप सदृश्य स्वरूपाचे झटके.

62
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील हिगंणघाट तालुक्यातील कानगाव,कोसुरला डौलापुर, मोझरी भैयापूर परिसरात आज दुपारच्या सुमारास भूकंप सदृश स्वरूपाचे हलके झटके जानवले.

या परिसरात साडेतीन वाजेच्या सुमारास नागरिक लाॅकडाउन मुळे घरात असतांना अचानक आवाज होवून जमिन हलायला लागली व घरातील असलेल्या वस्तू भांडी हलायला लागल्यावर काही नागरिक घराच्या बाहेर आलेत पाच ते सहा सेकंदाचे हलके झटके जाणवल्यामुळे येथे मुख्यालयात असलेले तलाठी एस. डब्ल्यू . अंबादे यांनी परिसराचा आढावा घेवून हिगणंघाटच्या तहसीलदाराला याबाबत माहिती दिली आहे.
अजून पर्यन्त वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून या भूकंपाच्या झटक्या बद्दल पुस्टी करण्यात आली नसून नेमकी जमीन कशामुळे हालली या बाबत शासनाच्या वतिने खुलासा करण्यात आल्यावरच नेमके कारण स्पष्ट होईल.