Home मराठवाडा कंधार व लोहा तालुक्यातील शासकीय, खाजगी डॉक्टर्स,सर्व पीएसी डॉक्टर्स, अँम्बुलन्स चालक व...

कंधार व लोहा तालुक्यातील शासकीय, खाजगी डॉक्टर्स,सर्व पीएसी डॉक्टर्स, अँम्बुलन्स चालक व पोलिस स्टेशनला श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ता. कंधारच्या वतीने (पीपीई) संरक्षक किटचे वाटप

54
0

नांदेड – ( राजेश भांगे ) सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यासह संबंध भारत देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे शासन स्तरावर हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच अशा आणी बाणीच्या काळात सर्वच जबाबदारी शासनाची नसून. तरी आपणही आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न आपल्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याने परिचित असलेल्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ता. कंधारच्या माध्यमातून केला आहे़.

यावेळी संस्थेचे संस्थापक व संचालक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार आदरणीय डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेबांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या व संस्थेचे सचिव, माजी आमदार आदरणीय भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेबांच्या सूचनेवरून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.सदस्य प्रा. डॉ. भाई पुरुषोत्तमरावजी धोंडगे साहेबांनी कंधार व लोहा या दोन्ही तालुक्यातील स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांना सेवा देणाऱ्या सर्व सन्माननीय शासकीय व खाजगी डॉक्टरांना तसेच सर्व पीएसीच्या डॉक्टर्सना व अॅम्ब्युलन्सच्या चालकांना तसेच पोलिस स्टेशनला पीपीइ किटचा परिपूर्ण सेट देऊन अशा आपत्तीच्या काळात आपले सेवाभावि कर्तव्य बजावले आहे. यासाठी डॉ.भगवानराव जाधव साहेब, डॉ. गजाननराव आंबेकर साहेब व महमद सिकंदर साहेबांच्या प्रयत्नातून पीपीइ किट उपलब्ध झाले त्याबद्दल त्यांचे आभार मानाची जयक्रांति..