Home सातारा कोरोणामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कुटुंबियांना मायणीत मोफत अन्नदानाचे वाटप. विनायक दुर्गोत्सव ,...

कोरोणामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कुटुंबियांना मायणीत मोफत अन्नदानाचे वाटप. विनायक दुर्गोत्सव , सांस्कृतीक क्रीडा मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम.

694

मायणी – दत्ता कोळी

कोरोणामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कुटुंबियांना मायणीत मोफत अन्नदानाचे वाटप. विनायक दुर्गोत्सव , सांस्कृतीक क्रीडा मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम. मायणी दि. २० प्रतिनिधी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दि. २२ पासून संपूर्ण देश लॉक डावून झाल्याने अनेक रोजगार बंद पडले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीची दखल घेऊन येथील विनायक दुर्गा उत्सव सांस्कृतिक क्रीडा मंडळ ,चांदणी चौक, यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशा उपासमार कुटुंबियांसाठी मोफत जेवणाची सोय केली असून याचा मायणी येथील गरजू, गरीब व वंचित कुटुंबियांना लाभ होत आहे. सध्या सर्वसामान्य नागरिकांना रोजगार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या लोकांना मोफत अन्न वाटप करावे अशा प्रकारचा प्रस्ताव या मंडळाचे क्रियाशील सदस्य दत्ता कोळी यांनी मांडला. या प्रस्तावास मंडळाच्या सर्व सदस्यांनी मान्यता दिली या मंडळाचे हे १९वे वर्ष असून गेल्या १९ वर्षात या मंडळाच्या माध्यमातून अनेक जनहिताचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. शनिवार दि. १८पासून ते लॉक डाऊनचा कालावधी संपेपर्यंत या मंडळाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना अन्नदान करण्यात येणार आहे. शासनाच्या कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय सदर उपक्रम सुरु करण्यात आला आहे.आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम लक्षात घेऊन अनेक नागरिक आपला मदतीचा हात या मंडळास आर्थिक व अन्नधान्याचा स्वरुपात देऊन एक आदर्श नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून योग्य तो सोशल डिस्टन्सचे चौकोन तयार करुन अतिशय शिस्तबद्धपणे दररोज सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये मंडळाचे कार्यकर्ते गरजू लोकांना अन्नदान करीत आहेत.ज्या लोकांना वयोमान झाल्यामुळे किंवा काही विमनस्क स्थितीत रस्त्यावरून हिंडत असतील अशा लोकांना त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मंडळाचे कार्यकर्ते त्यांना जेवण घरपोच नेऊन देत आहेत. शिरा, भात व आमटी यांची पार्सल तयार करून नागरिकांना त्याचे वाटप केले जात आहे. मंडळाच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .अशाच प्रकारच्या प्रेरणा घेऊन गावोगावी अशा कठीण प्रसंगी ज्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे अशा कुटुंबीयांना मदत करण्याचा एक आदर्श उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून राबविला असून असे उपक्रम गावोगावी राबविणे गरजेचे आहे.

सध्या या उपक्रमात विनायक मंडळाचे सचिन घाडगे, अक्षय दगडे ,विजय भोंगाळे,सोमनाथ चव्हाण,अमित माने,अविनाश दगडे,स्वप्नील भोंगाळे, रोहित देशमुख,मनोज माने,दर्शन गायकवाड,विजय घाडगे,सचिन माने,सुनील भोंगाळे,सुहेल तांबोळी,अभिजित भोंगाळे,संदीप घाडगे,अजय दगडे,अनिकेत भोंगाळे,महेश भोंगाळे,प्रवीण पोरे,सुशील दबडे हे कार्यकर्ते सामाजिकता जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताहेत.

चौकट

तहसीलदार अर्चना पाटील- मायणीतील विनायक दुर्गामाता मंडळाने समाजातील गरीब कुटुंबियाना अन्नदान करण्यास सुरुवात केली आहे.सोशल डिस्टन्स व सुरक्षिततेची काळजी घेत त्यांनी राबविलेला सामाजिक उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.