Home महत्वाची बातमी आखेर औरंगाबाद चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते निलंबित ,

आखेर औरंगाबाद चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते निलंबित ,

121
0

दारू आणि रोख रकमेसह करण्यात आली होती अटक

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी

जालन्यात वादग्रस्त ठरलेले आणि सध्या औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी असलेले डॉ अमोल गीते यांना 18 एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलिसांनी शासकीय वाहनात दारूच्या बाटली आणि 6 लाख 70 हजार नगद रकमेसह पकडल्याने आरोग्य खात्याची अब्रू चवट्यावर आली असून डॉ अमोल गीते यांना शासनाने तातडीने निलंबित केले आहे

सध्या कोरोना रोगाच्या संकटामुळे शासनाने लॉक डाऊन केलेले असून जिल्हा बंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले आहे तर अधिकाऱयांनी मुख्यालय सोडू नये असे सक्त आदेश असतांना औरंगाबाद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते हे 18 एप्रिल रोजी शासकीय वाहनात दारूच्या बाटल्या आणि 6 लाख 70 हजार रुपये घेऊन बदनापूर पोलीस हद्दीत आले

सदर शासकीय वाहनात हवाल्याची रक्कम असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक एस चौतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलीस निरीक्षक एम बी खेडकर ,पोलीस उपनिरीक्षक शिवशिंग बहुरे, उदयसिंग जारवाल,इरफान पठाण यांनी सदर वाहन औरंगाबाद जालना संयुक्त चेक नाक्यावरून सहजरित्या आल्याने योगायोग हॉटेल समोरील चेक नाक्यावर अडविले असता त्या वाहनात दारू व रक्कम मिळून आली असता पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग बहुरे यांच्या फिर्यादीवरून डॉ अमोल गीते विरुद्ध गुन्हा दाखल करून सदर आरोपीस नोटीस देऊन सोडून दिले होते

डॉ अमोल गीते यांची माहिती पोलिसांनी औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्यांना देताच तातडीने पदभार काढून पुढील कारवाई साठी प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवताच 24 तासाच्या आत शासनाने गीते यांचे निलंबन आदेश काढले