Home जळगाव पवित्र रमजान महिन्याचे लॉक डाऊन च्या नियमानुसार पालन करा

पवित्र रमजान महिन्याचे लॉक डाऊन च्या नियमानुसार पालन करा

136
0

मुस्लिम ईद गाह ट्रस्ट व दारुल कजा तर्फे आव्हान

रावेर (शरीफ शेख)

जळगाव -मुस्लिम धर्मीयांचे पवित्र रमजान महिन्याची सुरुवात २४ किंवा २५ एप्रिल पासून होत असून या पवित्र महिन्यात रोजा अर्थातच उपवास व तरावीह ची नमाज चे अनन्य साधारण महत्व असते त्यासोबत रोजा इफ्तार, जकात जमा करणे व वाटणे हे प्रमुख कर्तव्य या महिन्यात केले जात असतात परंतु लॉक डाऊन ची परिस्थिती ३ मे पर्यंत असल्याने या अवधीत काय करता येईल व कसे करता येईल याबाबत माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकने यांची भेट दारुल कजा जळगाव जिल्हा प्रमुख मुफ़्ती अतीकउर रहमान व मुस्लिम इदगाह ट्रस्ट चे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी घेऊन त्यांच्याशी सर्व मुद्द्यांबाबत चौकशी करून मार्गदर्शन घेतले.
त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्यांक विकास विभागाचे दिनांक १८ एप्रिल २०२० चे परिपत्रक वाचून समजून सांगितले असून त्यानुसार या पवित्र रमजान महिन्यात सुद्धा खालील अटीचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
*रमजान साठि अटी व शर्ती*

१) लॉक डाऊन चे पालक पवित्र रमजान महिन्यात सुद्धा कटाक्षाने व काटेकोरपणे करण्यात यावे
२) कोणीही मुस्लिम समुदायाच्या लोकांतर्फे मशिदीत नमाज, तरावीह ची नमाज किंवा रोजा इफ्तार करता कामा नये
३) आपल्या घराच्या वर अथवा इमारतीच्या टेरेसवर कोणत्याही प्रकारची नमाज रोजा इफ्तार करता कामा नये
४)आपल्या परिसरातील मोकळी जागा किंवा ओपन स्पेस वर एकत्रित रित्या नमाज व इफ्तार करू नये
५)कोणत्याही प्रकारचे सामाजिक ,धार्मिक व कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित करता कामा नये.
६) सर्व मुस्लिम बांधवांनी नियमित ची नमाज, तरावीह ची नमाज व रोजा इफ्तार आप आपल्या घरातच करावे
७) तीन मे पर्यंत लॉक डाऊन असल्याने याची अंमलबजावणी करावी जोपर्यंत शासनाचे पुढील आदेश येत नाही तोपर्यंत हे आदेश लागू राहतील अशा आशयाचे आदेश अप्पर मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य जयश्री मुखर्जी यांचे आदेशची प्रत देऊन जिल्हाधिकारी यांनी सुद्धा मुस्लिम समुदायास याची अंमलबजावणी करण्याची विनंती केलेली आहे.

शासनाचे आदेशाचे दारुल कजा चे मुफ़्ती
अतीकुर्रहमान, मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष गफ्फार मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी मुस्लिम समुदाय यांना आव्हान केले आहे की वरील सर्व अटी व शर्ती चे आपण पालन करावे व आपल्या घरातच तरावीह ची नमाज व रोजा इफ्तार करण्यात यावे.