Home विदर्भ स्पर्धा परिक्षार्थ्यांना वयोमर्यादेत एक वर्षाची मुदत वाढ द्या – एन.एस.यु.आय.

स्पर्धा परिक्षार्थ्यांना वयोमर्यादेत एक वर्षाची मुदत वाढ द्या – एन.एस.यु.आय.

87
0

देवानंद खिरकर

अकोला / अकोट – 26 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या राज्य सेवा पुर्व परिक्षा 2020 लॉकडाऊनमुळे स्थगीत करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.तसेच 10 मे रोजी होणार्या महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रीत अधिकारी व गट ब सयुक्त परिक्षा रद्द करत लांबणीवर टाकण्यात आली आहे.परिणामी स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्याचे एक वर्षाचे नुकसान होणार असल्याने स्पर्धा परिक्षा साठी असलेल्या वयोमर्यादित एक वर्षाची वाढ देण्यात यावी अशी मागणी एन.एस.यु.आय.ने राज्याच्या मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.
जगासह देशात व राज्यात कोरोना या महामारीमुळे लॉकडाऊनचा निर्बंध घालण्यात आला.कोरोना विरुध्दचे हे युध्द केव्हा व कुठपरंत चालेल याची शाश्वती खुद्द सरकारला सुध्दा नाही परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये अनेक विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी म्हणून हे वर्ष असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही या विद्यार्थ्यांचे नुकसान हेतू ठेवता शासनाने स्पर्धा परिक्षार्थ्यांना वयोमर्यादेत एक वर्षाची मुदतवाढ द्यावी अशी मागणी जिल्हा एन.एस.यू.आय चे अध्यक्ष संकेत कुलट यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.