Home विदर्भ कोरोना बाबत ग्राम पंचायत बोर्डी घेत आहे गंभीर दखल..

कोरोना बाबत ग्राम पंचायत बोर्डी घेत आहे गंभीर दखल..

45
0

अकोट / बोर्डी – संपूर्ण देशात सुरु असलेल्या कोरोना या विषाणु बाबत अकोट तालुक्यातील ग्राम पंचायत बोर्डी हे वेळोवेळी पुर्णपणे दखल घेतांना दीसत आहे.ग्राम पंचायत मार्फत गावामधे कीटकनाशकची दोनवेळा फवारणी सुध्दा करण्यात आली आहे.व गावात ठिकठिकाणी कोरोना या विषाणु बाबत भिंतीवर बोर्ड सुध्दा लावले आहेत.व आज ग्राम पंचायत मार्फत वार्ड नंबर 2 मधे सरपंच संजय ताडे,लिपिक बाळासाहेब सोनोने,आशा जयश्री लाहोरे,अगंणवाडी क्रमांक 5 मदतनिस दिपिका खिरकर यांनी आज प्रत्येक घरोघरी जावुन हँडवॉशचे वाटप सुध्दा केले आहे.तरी कोरोना या विषाणु बाबत ग्राम पंचायत बोर्डी हे वेळोवेळी घेत असलेल्या दखल बाबत गावातील नागरिकांनी पूर्णपणे समाधान व्यक्त केले आहे.