Home विदर्भ “56 ” ईंची छातीचा सरपंच

“56 ” ईंची छातीचा सरपंच

134
0

देवानंद जाधव – मांगुळ

यवतमाळ – तालुक्यातील, निसर्गाच्या कुसीत टुमदार पणे वसलेले गोजिरवाणे गाव म्हणजे बेचखेडा , मनगटाच्या जोरावर हातावर आनुण पानावर खाणार्या कष्टकरी माय बापाचं गाव , सध्या अवघ्या जगाच्या उरावर एक विषाणू थयथय नाचतो आहे. सर्वञ कुलूपबंद आहे, अशात माझ्या गावातील कुणीही भाकरी पासुन वंचित राहु नये, कुणाचीही ऊपासमार होऊ नये,या साठी ज्याचा तिळ तिळ जीव तुटत होता , त्या रमेश भाऊंनी अवघ्या गावाची चुल पेटवली, मायेची ममता , प्रेम , आणि प्रेरणा देत तमाम ग्रामस्थांना जगण्याचं बळ दिलंय , अशा सोन्या सारख्या अथांग अंतःकरणाच्या आणि 56 ईंची छातीच्या सरपंच रुपी देवमाणसाला काळजाच्या तिजोरीतील प्रितीचा सारा जिव्हाळा ओतून मानाचा मुजरा…!