Home विदर्भ कोरोना प्रतिबंध , थ्रोट स्वॅब तपासणी मशीन अमरावतीत

कोरोना प्रतिबंध , थ्रोट स्वॅब तपासणी मशीन अमरावतीत

23
0

विद्यापीठात दोन मशीनची चाचपणी
तपासणी अहवाल त्वरित मिळण्याची सोय
– पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती , ( मनिष गुडधे ) दि.१७ – कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी तात्काळ उपाययोजनेच्या अनुषंगाने चाचण्यांसाठी अमरावतीत दोन लॅब सुरु होत आहेत. त्यामुळे आता थ्रोट स्वॅब नमुने अहवाल आता अमरावतीतच मिळू शकतील. शासनाकडून दोन मशीन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे लगेच तपासणी अहवाल प्राप्त होऊन उपचाराला गती मिळणार आहे.

आतापर्यंत थ्रोट स्वॅब नमुने नागपुरच्या प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे अमरावतीत लॅब सुरु होण्याच्या दृष्टीने पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार अमरावतीला या दोन मशीन मिळाल्या असून गुरूवारी प्रायोगिक तत्वावर त्याची चाचपणीही करण्यात आली.

आयसीएमआरच्या ॲप्रुव्हलची प्रतीक्षा

अमरावती शहर हे प्रशासकीय स्तरावर विभागाचे मुख्यालय असल्याने येथे कोरोना थ्रोट स्वॅब तपासणी यंत्र उपलब्ध व्हावे, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून जोर धरू लागली होती. याबाबत पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी शासनस्तरावर सतत पाठपुरावा केला. यात त्यांना यश मिळाले आहे. विद्यापीठाच्या सीआयसी युनिटमध्ये या दोन मशीन प्राप्त झाल्या आहेत. आता केवळ आयसीएमआर (इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) यांच्याकडून मान्यतेची प्रतीक्षा आहे. विद्यापीठाच्यावतीने त्यासाठी प्रपोजलही पाठविण्यात आले असून दोन दिवसातच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोरोना संशयिताच्या थ्रोट स्वॅब नमूने अहवाल लगेच अमरावती उपलब्ध होणार आहे.

मोफत तपासणी

या मशीनसह किट शासनाच्यावतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अमरावतीत ही व्यवस्था नसल्याने थ्रोट स्वॅब नमुने नागपुरला पाठविले जात होते. त्याचा अहवाल मिळायला विलंब होत होता. त्यामुळे निदान लागायला उशीर होऊन नेमका उपचार करण्यासही अडचणी येत होत्या. परंतु आता अमरावतीतच या मशीन आल्याने लगेच तपासणी अहवाल प्राप्त होऊन उपचार करणे सोयीचे होणार आहे. विद्यापीठाच्या सीआयसी युनिटचे विशेषज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. निरज हनुमंते यांनी गुरूवारी मशीनची टेस्टिंग घेतली.

महत्वाची सुविधा उपलब्ध : पालकमंत्री

अमरावती येथे थ्रोट स्वॅबचा चाचणी अहवाल मिळण्याची सुविधा नव्हती. त्यातही अनेक अहवाल प्रलंबित राहिल्याने संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे ही लॅब सुरु करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून संयुक्त पाठपुरावा केला. डीपीडीसीतर्फे निधी उपलब्ध करण्यात आला. लवकरच लॅब सुरू होतील. ही सुविधा कायमसाठी उपलब्ध राहील. डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथेही लॅब लवकरच कार्यान्वित होत आहे, असे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

दोन दिवसात तपासणी सुरु होण्याची शक्यता

थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीकरिता शासनाकडून मशीन व किट्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याशिवाय आम्ही कोणत्याच प्रकारचा फंड घेतला नाही. आयसीएमआरकडून मान्यता मिळताच टेस्टींग सुरु करण्यात येईल. येत्या दोन दिवसात हे मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या मशीनची टेस्टींग आमच्या विशेषज्ञांकडून करण्यात आली आहे.

-मुरलीधर चांदेकर, कुलगूरु

खूप मोठी सुविधा झाली

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सीआयसीमध्ये यंत्रणा पोहचली आहे. आयसीएमआरच्या मान्यतेनंतर लगेच थ्रोट स्वॅब नमून्यांची तपासणी सुरु केली जाईल. ही एक खूप मोठी सुविधा जिल्ह्यात सुरु होत आहे. विद्यापीठाने याकरिता आयसीएमआरला प्रस्ताव पाठविला आहे. आम्हीसुध्दा त्याचा पाठपुरावा करत आहोत. ॲप्रुव्हल मिळताच तपासणीला सुरुवात होईल – शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

Unlimited Reseller Hosting