Home विदर्भ आमदार नितीन देशमुख यांच्या पुढाकारातून अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनिअर्स असोसिएशन यांचे...

आमदार नितीन देशमुख यांच्या पुढाकारातून अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनिअर्स असोसिएशन यांचे मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदत निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त

30
0

अकोला – राज्यासह देश आणि जगामध्ये सध्या covid १९ या संसर्गजन्य अाजाराच्या प्रादुर्भावामुळे सर्व समाजमन सुन्न झाले आहे ,मानवी हितासाठी प्रशासन पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. पण यामध्ये खूप खूप मोठे आर्थिक संकट सुद्धा राज्य शासन समोर उभे राहिले आहे .या आर्थिक संकटाचा आणि covid १९ चा सामना करण्यासाठी समाजातील अनेक दानशूर मंडळी समोर येत आहे, यामध्येच बाळापूरचे कर्तव्यदक्ष आमदार नितीन देशमुख यांच्या पुढाकारातून अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनिअर्स असोसिएशन मदतीसाठी पुढे आली आहे. चार दिवसापूर्वी आमदार नितीन देशमुख आणि अकोला जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची एक मीटिंग झाली.आणि यामध्ये सर्वानुमते १८७६८६६ ,रुपये (अठरा लक्ष शहात्तर हज़ार आठशे सहासष्ठ रुपये) इतका मदत निधी देण्याचे ठरले. त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी अकोला ,यांच्याकडे दिनांक १६ एप्रिल २०२० ला हा संपूर्ण निधी याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.या संकटाच्या वेळी अकोला ज़िल्हातील जास्तीत जास्त दानशूर मंडळीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी समोर यावे, आणि मदत करावी असे आवाहन आमदार नीतिन देशमुख द्वारे करण्यात आले ,यावेळी अकोला जिल्हा कॉन्टॅक्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप उर्फ बंडू देशमुख उपाध्यक्ष योगेश सुर्वे ,श्री प्रदीप सिंह चंदेल, नितिन लवहाले, अजय ठाकुर,राजु घुले,वसंतराव देशमुख,सुनील गावडे,यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting