Home बुलडाणा अता रस्त्यावर थुकल्यास 5000 हजार रुपये दंड ,

अता रस्त्यावर थुकल्यास 5000 हजार रुपये दंड ,

192

दुकानदाराने मास्क न लावल्यास ही दंड ,

अमीन शाह

बुलडाणा ,

कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील होणारी नागरिकांची गर्दी कमी करणे आवश्यक आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यात सार्वजनिक स्थळी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर कायम मास्क न वापरणे, दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन न करणे, किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी दरपत्रक न लावणे आदी गुन्ह्यांविषयी दंड लागू केला आहे.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही आपत्ती व्यवसथापन कायदा 2005, साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंडसंहीता कलम 188 नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.

असे आहे दंड

सार्वजनिक स्थळी उदा. रस्ते, बाजार, रूग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी थुंकणे हा गुन्हा करताना प्रथम आढळल्यास 500 रूपये दंड, दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. चेहऱ्यावर सार्वजनिक स्थळी मास्क अथवा रूमाल न वापरणे असे करताना प्रथम आढळल्यास 500 रूपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई होणार आहे. तसेच दुकानदार, फळे व भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखणे हा गुन्हा पहिल्यांदा केल्यास 500 रूपये दंड प्रति ग्राहक अथवा व्यक्ती, 1500 रूपये दंड आस्थापना मालक अथवा दुकानदार, विक्रेता यांच्याकडून वसूल करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्यांदा केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.किराणा अथवा जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास असे पहिल्यांदा आढळल्यास 5000 रूपये दंड व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम ही स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग वसूल करणार आहे.