Home जळगाव कोरोना रूग्णाच्या घरवापसी बद्दल मनियार बिरादरी ने भादली च्या गरिबांना वाटले अन्नधान्य

कोरोना रूग्णाच्या घरवापसी बद्दल मनियार बिरादरी ने भादली च्या गरिबांना वाटले अन्नधान्य

528

जळगाव: एजाज़ शाह

शहर नव्हे तर जिल्हा हा आज अल्लाहच्या कृपेने कोरोना मुक्त झाल्याने जळगाव जिल्हा मनियार बिरादरी ने अल्लाहचे आभार मानून वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठा डॉक्टर भास्कर खैरे त्यांचे सर्व सहकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चव्हाण, अपर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर किरण पाटील ,डॉक्टर योगिता बावस्कर,या सर्वांचे तसेच नर्सिंग स्टाफ चे सुद्धा आभार मानले व जळगाव जिल्हा कोरोना मुक्त झाल्यामुळे भादली या खेडेगावात जाऊन तेथील गरजवंत, मजूर व अत्यंत गरीब अशा पंधरा लोकांना पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू ,दोन किलो दाळ ,एक लिटर तेल व पाव किलो चटणी असे तेथील जबाबदार रज्जाक मनियार, अल्लाबक्ष शेख,रिजवान शेख यांच्या सुपूर्द करून त्यांच्या हस्ते वाटण्यात आले.
यावेळी बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख संचालक सलीम मोहम्मद हारून मेहबूब, मोहम्मद आबिद यासह इंडिया ३६५ चे मोहसिन यांची उपस्थिती होती.
प्रशासनाचे सुद्धा आभार*

जळगाव जिल्हा खऱ्या अर्थाने आज कोरोना मुक्त झाला असला तरी त्याचे सर्व श्रेय जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकने,पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले यांच्यासह त्यांच्या संपूर्ण संघ तसेच विविध माध्यमांचे प्रतिनिधी यांनी ज्याप्रमाणे सामाजिक आंतर, मास याबद्दल जागृकता आणली त्यामुळे आपण काही प्रमाणात कोरणावर मात करू शकलो आज आपण पूर्ण पणे कोरोना मुक्त झालो असलो तरी अजून आपल्याला लढाई लढायची आहे म्हणून सर्वांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे असे नम्र पूर्व आवाहन जळगाव जिल्ह्या मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी केले आहे.