Home विदर्भ सोशल डिस्टनगसिंग पाळून जि. प.शाळेत होत आहे पोषण आहार योजनेचे धान्य वाटप.

सोशल डिस्टनगसिंग पाळून जि. प.शाळेत होत आहे पोषण आहार योजनेचे धान्य वाटप.

131
0

पोषण आहारातील धान्याचे विद्यार्थ्यांना वाटप

यवतमाळ / फुलसावंगी ( प्रतिनिधी ) – येथील जिल्हा परिषद विद्यालयात शासना कडून विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेला शालेय पोषण आहार हे शाळा बंद असल्याने शिल्लक होता ते आज शासनाच्या आदेशाने विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले या वेळी शाळा व्यवस्थापन समिती ने विद्यार्थ्यांना धान्य वितरित करतांनी सोशल डिस्टसिग ची सुयोग्य अशी व्यवस्था करण्यात आली होती.
सद्या राज्या मध्ये व शाळा मधून राबविली जाणारी व देशात सर्वात जास्त
लाभार्थी असणारी योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना होय. शालेय पोषण आहार योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणाच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विध्यार्थी पटनोदणीचे व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना सुरू करणात आली आहे. मात्र जगावर कोरोना नामक संकट ओवडल्याने देशा सह आपल्या राज्यातील शाळा तातळीने बंद करणात आल्या. अशा परिस्थितीत विद्यार्थी व बालके पोषण आहारा पासून वंचित राहू नये म्हणून मा.सर्वाच न्यायालय यांनी दिलेले निर्देश व या बाबतीत केंद्र शासना कडून आलेले मार्गदर्शन विचारात घेऊन विद्यार्थ्यांना पोषण आहार देने आवश्यक आहे . म्हणून ग्रामीण भागातील शाळा स्थरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी, कडधान्य विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश देण्यात आले . आज या आदेशाची अंमलबजावणी करीत येथील जिल्हा परिषद विद्यालयातील 5 वी ते 8 वी च्या 474 विद्यार्थ्यांना धान्य वितरण करण्यास सुरुवात करण्यात आली . वर्ग 5 ते 8 वी च्या 474 विद्यार्थ्यांना धान्य वितरित करणात आले. या वेळी शाळा व्यवस्थापन समिती कडून सोशल डिस्टनगसी ची योग्य निगा राखण्यात आली.

▪️अंत्यत महत्वाचे निर्णय – स्वागतार्ह
करोना या महामारी चा सामना करीत असतांनी शाळा बंद करण्यात आल्या आता उर्वरित शालेय पोषण आहाराचे काय करावे ? हा प्रश्न होताच पण शासनाने हे धान्य वितरण करून गोर गरीब कुटुंबाना मोठा आधार दिला आहे .
अत्यंत महत्वाचे व तेवढेच स्वागतार्ह निर्णय-
विवेक म.पांढरे
अध्यक्ष
शाळा व्यवस्थापन समिती, फुलसावंगी

Unlimited Reseller Hosting