Home मराठवाडा देगलूर येथे लाॕकडावुन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुख्याधिकाय्रांनी केली धडाकेबाज कारवाही

देगलूर येथे लाॕकडावुन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुख्याधिकाय्रांनी केली धडाकेबाज कारवाही

89
0

नांदेड, दि.१५ ; राजेश भांगे – कोरोना व्हायरची दहशत वरचेवर वाढत असतानाच काहि हौसे-गौसे मात्र रस्त्यावर ( बेफिकिर ) फिरतच असल्याचे दिसुन येत असल्याने त्यावर प्रतिबंध म्हणून देगलूर तहसिलदार मा.अरविंद बोळंगे यांनी शहरातील हाॕस्पिटल, मेडिकल्स वगळता आवश्यक सुविधा देणारे दुकाने दोन दिवसाआड चालु राहतील असे सांगितल्या नंतरही मात्र काही दुकाने चालूच असल्याची माहिती मुख्याधिकारी व तहसिलदार यांना मिळाली असता तेथे भेट देऊन त्या दुकानांना दंड आकारण्यात आले आहे. तसेच आवश्यक कामांकरीता सुद्धा दोन दिवसांआड बाजारपेठेत यावे असे आदेश काढले असताना सुद्धा विनाकारण शहरातील मुख्य रस्त्यावर येवुन फिरणे व तोंडाला मास्क न लावणे, रस्त्यावर थुंकणे आदि बाबतीत २८ जणांवर नगर पालिका मुख्याधिकारी देगलूर, मार्फत दंडात्मक कारवाही करण्यात आले. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७ दुकानांचा समावेश असुन झालेल्या कारवाहीत एकुण ५४०० दंड वसुल करण्यात आल्याचे मुख्याधिकारी श्री ईरलोड यांनी कळविले. तरी या निमित्याने लाॕकडावुनच्या काळात घातलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर देगलूर प्रशासना मार्फत धडाकेबाज दंडात्मक कारवाही होताना दिसुन आले.
तसेच या कारवाही दरम्यान उपविभागीय अधिकारी मा.शक्ती कदम, सहाय्यक पोलिसाधिकारी मा.सरवदे, तहसिलदार मा.अरविंद बोळंगे, मुख्खाधिकारी मा.गंगाधर इरलोड, सहाय्यक पो.नि.पडगेवार, नायब तहसिलदार नरवाडे, तसेच नगरपरिषद, तहसिल व पोलिस प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.