Home विदर्भ तळेगांव पोलिसांची वाॅश आउट मोहिम….!

तळेगांव पोलिसांची वाॅश आउट मोहिम….!

44
0

वर्धा / तळेगांव (शा.पंत) :- तळेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भिष्णूर, नबाबपुर, टेकोडा, गोदावरी, भारसवाडा येथील वर्धानदि शिवारात धडक कारवाई करित गावठी दारु काढण्याकरिता असलेला लाखोचा मोहा रसायन सडवा तळेगांव पोलिसांनी नष्ट केला.

सविस्तर वृत्त असे की तळेगांव पोलिसांना वर्धा नदी काठावरील सदर शिवारात गावठी दारुची निर्मिती होत असल्याची माहिती मिळताच तळेगांव पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापा घातला असता ९४ पिपे मोहा रसायन साठा जवळपास ७० हजाराचा मुद्देमाल जप्त करुन
पोलिसांनी जागेवरच नष्ट केला. यातील आरोपी फरार झाले असुन सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मैराळे यांचे मार्गदर्शनात ठानेदार रवी राठोड .जमादार सुधिर डांगे,संदीप महाकाळकर,राजेश साहू.ना.पो.शी.परवेज खान ,अंकुश येडमे, पो.शी. अमोल इंगोले, विजय उइके, अनिल ढाकणे, मनोज व गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी केली.

रविंद्र साखरे सह इकबाल शेख 9890777242 / 9834453404

Unlimited Reseller Hosting