Home मराठवाडा प्लास्टिक पिशव्या आणा कापडी पिशवी घेऊन जा , बदनापूर नगर पंचायत चा...

प्लास्टिक पिशव्या आणा कापडी पिशवी घेऊन जा , बदनापूर नगर पंचायत चा उपक्रम ,

40
0

सय्यद नजाकत

बदनापूर, दि. 15 (प्रतिनिधी): पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनतेतील प्लास्टिक बंदीसाठी बदनापूर नगर पंचायत विविध उपक्रम राबवत असते, त्या अनुषंगानेच शहरातील कोणत्याही नागरिकांने जर अर्धा किलो प्लास्टिक जमा करून आणले तर त्याला नगर पंचायतकडून एक कापडी पिशवी देण्यात येत असल्यामुळे या अभिनव कल्पनेमुळे शहरातील प्लास्टिकचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी व्हावी, असे निर्देश देण्यात आलेले आहे. त्यानुसार बदनापूर नगर पंचायत प्लास्टिक मुक्त बदनापूर होण्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे दिसून येते. यापूर्वीळी जानेवारी महिन्यांपासून बदनापूर नगर पंचायतचे मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, अभियंता गणेश ठुबे यांनी पुढाकार घेऊन बदनापूर येथील प्रत्येक शाळेतील मुलांना आपल्या घरातील परिसरातील प्लास्टिक आणण्याच्या सूचना देऊन प्लास्टिक आणणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन, पेन्सील आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात येत होते. त्यावेळीही मोठया प्रमाणात प्लास्टिक जमा झाले होते. हे प्लास्टिक नगर पंचायतच्या वतीने रिसायकल युनिटला देण्यात येऊन त्याची विल्हेवाट लावण्यात येत असे. कोरानाच्या पार्श्वभूमीवर बदनापूर नगर पंचायत सध्या मोठया प्रमाणात उपाययोजना करत असतानाच प्लास्टिक मुक्तीचा विसर न होऊ देता नवीन संकल्पना राबवण्यात येत आहे. बदनापूर परिसरातील नागरिकांना नगर पंचायतच्या वतीने आवाहन नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे वापरलेले प्लास्टिक इतरत्र फेकण्यात येऊ नये म्हणून हे प्लास्टिक जमा करून ठेवून अर्धा किलो प्लास्टिक जमा झाल्यास नगर पंचायतच्या वतीने हे अर्धा किलो प्लास्टीकच्या बदलत्यात एक सुंदरशी कापडी पिशवी देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा उददेश सांगताना अभियंता गणेश ठुबे म्हणाले की, वापरण्यात येणारे प्लास्टिक उघडयावर पडत असल्यामुळे हे प्लास्टिक नष्ट होत नाही त्यामुळे आम्ही ही संकल्पना राबवण्याचे ठरवले असून घरात वापरात येणारे प्लास्टिक कचऱ्यात न टाकता बाजूला ठेवावे व जमा झालेले प्लास्टिक नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावे, त्या बदल्यात त्यांना एक कापडी पिशवी देण्यात येईल, या माध्यमातून उघडयावर प्लास्टिक न पडल्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नसून शहरत सुंदर होण्यासाठी नागरिकांचाही हातभार लागेल, असे सांगून या उपक्रमात शहरातील नागरिक व व्यापारी मोठया संख्येने सहभागी होत असलयाचे सांगितले.

Unlimited Reseller Hosting
Previous article
Next articleतळेगांव पोलिसांची वाॅश आउट मोहिम….!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.