Home बुलडाणा ट्रॅक्टर पलटुन एका हमालाचा जागीच मृत्यू तर सहा जखमी

ट्रॅक्टर पलटुन एका हमालाचा जागीच मृत्यू तर सहा जखमी

61
0

प्रा.तनज़ीम हुसैन – चिखलीचिखली शहरातील एमआयडीसी मधील महाबीज महामंडळ च्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या जाजू यांच्या गोडाऊन वरुण ट्रॅक्टर मधून सोयाबीन घेऊन महाबीज मध्ये घेऊन येत असताना एमआयडीसी मध्ये मिरा इंडस्ट्रीज जवळ टर्निंग मध्ये ड्रायव्हर चा तोल गेल्याने ट्रॅक्टर पलटी झाला, त्या मध्ये बसलेले, शेख शब्बीर शेख. जमाल वय ५० वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला .तर ईतर सहा जन जखमी झाले त्यांना ग्रामीण रुग्णालय चिखली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जख्मी शेख जमील शेख चांद ४०,बालू सोनाजी इंगले३६, सै.वाजिद सै.जावेद २७,सुनील रक्ताडे २७, शेख.शाहिद शेख जुलकर्नैन ३२, शायद काज़ी ३८,
,रक्ताच घाम करून गाळणाऱ्या हमालांना बांधकाम कामगार महामंडळ सारखीच मृत्यू पूर्व व नंतर मिळणाऱ्या शासकीय सुविधा देण्यात याव्या व महामंडळ कडून हमालांचे विमा तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तीस आणि जखमींना आर्थिक मदत मिळावी अशी त्या हमालांच्या परिवाराकडून मागणी होत आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद दवणे हे करीत आहे.

Unlimited Reseller Hosting