Home मराठवाडा कंधारच्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसाटिच्या वतीने “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९...

कंधारच्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसाटिच्या वतीने “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ ” ला पालकमंत्री हस्ते करण्यात आली आर्थिक सहाय्यता

77
0

नांदेड, दि. १४ ( राजेश भांगे ) – आपल्या देशात व राज्यात कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावाने सर्व जनजीवन अस्तव्यस्त झाले असुन या संकाटाशी सामना करण्यासाठी आर्थिक सहाय्यता म्हणून संस्थेचे संस्थापक व संचालक माजी आमदार व खासदार डाॕ.भाई मा.केशवरावजी धोंडगे साहेब तसेच संस्थेचे सचिव माजी आमदार भाई मा.गुरूनाथरावजी कुरूडे साहेब यांच्या सुचने नुसार
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ ला, श्री.शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी(ता.कंधार) च्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून रु. (एक लाख आकरा हजार एकशे आकरा रुपये) चा आर्थिक निधी पालकमंत्री मा.ना. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ ला देण्यात आले.

तरी यावेळी यावेळी संस्थाध्यक्ष मा.प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे माजी जि.प.सदस्य नांदेड, आमदार मा.अमर राजूरकर, आमदार मा.शामसुंदर शिंदे, डॉ. श्याम तेलंग काका, माजी सभापती मा. बालाजीराव पांडागळे साहेब, उप विभागीय अधिकारी मा. बोरगावकर, आदीजनाची यावेळी उपस्थिती होती.