
रावेर (शरीफ शेख)
कोरूना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लोक डाउन सुरू आहे त्यामुळे रोज कमावणारे व रोज खाणारे कुटुंबांना खूप त्रास होत आहे अशी कुटुंबांसाठी दावत ए इस्लामी हिंद संपूर्ण भारतात कोरोनाव्हायरस वेल्फेअर मोहीम राबवत आहे या मोहिमेअंतर्गत गरीब गरजू निराधार कुटुंबांना १२००/ बाराशे रुपये प्रमाणे रोख रक्कम व धान्य दिल्या जात आहे या मोहिमेअंतर्गत भुसावळमध्ये ही अशी ४० चाळीस कुटुंबांना १२००/बाराशे प्रमाणे रोख रक्कम व १५० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले या कामात भुसावळ शहर प्रमुख श्री इम्रान अत्तारी, हाजी तनवीर, रफिक कादरी, युसुफ खान,सैय्यद साबीर,हाजी शाकीर सईद अत्तारी रफिक रोशन यांनी परिश्रम घेतले.











































