Home मराठवाडा देगलूर येथे समाजसेवक शाखावार यांच्या कडून ३२५ गरजु कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

देगलूर येथे समाजसेवक शाखावार यांच्या कडून ३२५ गरजु कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

276

नांदेड , दि. १३ (राजेश भांगे ) – देगलूर शहरातील गोर गरीब व दिनदुबळ्यांच्या अडिअडचणीत धावुन जाणारे व्यक्तीमत्व म्हणून समाजसेवक नंदकिशोर शाखावार यांचे नाव सुपरिचित आहे.
कोरोना व्हायरने देशात व राज्यात घातलेल्या थैमानामुळे २३ मार्च पासुन लाॕकडावुन घोषित करण्यात आले असल्याने गोरगरिब रोजंदारिवर काम करणाऱ्या मजुरांचे मोठे हालआपेष्टा होत आहेत तरी शासनाकडुन मदत येई पर्यंत गोरगरिब लोकांनी जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, गरीबीची जाणीव असलेले नंदकिशोर शाखावार यांनी यावेळीही आपत्तिच्या काळात आपल्या कडुनही एक हात मदतीचा, फुल नाही फुलाची पाखळी म्हणत ३२५ दिनदुबळ्या गरजु कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्य म्हणून प्रति कुटुंब
१० कि.तांदूळ, १कि.तुरदाळ, खाद्य तेल १ कि., २००ग्रा. मिरची पावडर, १०० ग्रा. हळद, १ कि.मीठ, १००ग्रा. जीरा, १कि.वाशिंग पावडर, १आगपेठि पुडा, साबनाची १जोडी, अशा दैनदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक साहित्यांचे समाजसेवक नंदकिशोर शाखावार यांच्या कडुन यावेळी वाटप करण्यात आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक गरजु व्यक्तींना टोकन दिले गेले व टोकन घेवुन सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत या जीवनावश्यक साहित्य किट चे वाटप केले गेले. तरि शाखावार यांच्या कडुन घेतलेल्या या उपक्रमामुळे अनेक गरिब कुटुंबियांना दिलासा मिळणार असुन या उपक्रमा बद्दल त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक व प्रशंसा होताना दिसुन आले.
तरी सदर उपक्रमाच्या वेळी तहसिलदार मा. अरविंद बोळंगे, मुख्याधिकारि मा. गगाधर इरलोड, सहाय्यक पो.नि. पडगेवाड, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, राष्ट्रवादि काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष तथा विरोधी पक्ष नेते न.पा. देगलूर लक्षमिकांत पद्दमवार, माजी उपनगराध्यक्ष न.पा. गटनेते अविनाश निलमवार, लेखापाल व्यंकटराव कांबळे, माजी उपनगराध्यक्ष रोयलावार, माजी उपनगराध्यक्ष टेकाळे, माजी नगराध्यक्ष केरूरकर, व पत्रकार बांधव आदिंची उपस्थिती होती.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी योगेश शाखावार, निलेश शाखावार, सतिश शाखावार, सुधिर शाखावार, सोपान इंदुरकर, रत्नाकर कळसकर, अशोक सुर्यवंशी, अनिकेत कोंढेकर, गडपवार, बादावार, खाजा, आदि मित्र मडळींनी परिश्रम घेतले.