July 14, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोस घोडके यांची दादागिरी , “पोलीस ठाण्यातून परत येणाऱ्या पत्रकारास काठिने मारहाण”

अंबड – प्रतिनिधी

जालना , दि. ०३ :- आज दिंनाक २ एप्रिल रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी अंबड पोलीस स्टेशनला शहरात संचार बंदी असल्यामुळे वृत्तसंकलनाकरिता स्वःताच्या मोटरसायकलची पास काढण्यासाठी गेले होते काम आटोपल्यावर पोलीस स्टेशन येथुन घराकडे परत येत असताना अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष घोडके यांनी राम मंदिरा समोर रसत्यावर गाडी अडवून शिवीगाळ करुन मारहाण केली.

याबाब सविस्तर माहीती अशी अंबड येथील दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी लक्ष्मण राक्षे हे शहरात संचारबंदी असल्याने त्याचे पालन व्हावे म्हणून अधिकृत पास घेण्याकरिता अंबड पोलीस स्टेशनला ते त्यांच्या गाडीची पास काढण्यासाठी गेले होते पास घेवुण ते परत घराकडे येत असतांना सहाय्यक पोलीस निराक्षक संतोष घोडके हे राम मंदिर येथे उभे होते त्यावेळस संतोष घोडके यांनी दैनिक तरुण भारत प्रनिधीनी लक्ष्मण राक्षे यांची गाडी रसत्यावर अडवुन कोणतीही विचारपुस न करता अश्र्शिल भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. केंद्रीय मंञी प्रकाश जावडेकर यांनी आदेश दिलेले असतांना देखील अंबडच्या मुज्जोर पोलिसांकडून पत्रकांराना मारहाण करणे त्यांच्या मोटर सायकली जप्त कारणे असे प्रकार चालूच आहे पञकार , डाँक्टर , किराणा दुकानदार मेडीकल यांना संचारबंदित सूट दिलेली असतांना काही पोलीस कर्मचारी पदाचा गैर वापर करुण किराणा दुकानावर कामकरणाऱ्या मुलांना ठाण्यात आणून बसवत आहे तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष घोडके हे पञकारांना एखाद्या गुंडा प्रमाणे वागणुक देत आहे अशा मुज्जोर सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष घोडके यांच्यावर पोलीस अधिक्षक एस.ए.चैतंन्य हे काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे .

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!