Home मराठवाडा अन , त्या ऊसतोड कामगार मजुरांच्या निवाऱ्याची सोय लागली ,

अन , त्या ऊसतोड कामगार मजुरांच्या निवाऱ्याची सोय लागली ,

188

माजी मंत्री , जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली दखल ,

अँड. ताज अहेमद अन्सारी

बीड

कोरोना विषाणूमुळे राज्यभरात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर बीडमधील ऊसतोड कामगार आपल्या गावाकडे परतू लागले होते मात्र प्रशासनाने या मजुरांना आहे तिथेच थांबण्याचा आदेश दिला त्यामुळे या स्थितीत जवळच असलेल्या सैनिकी विद्यालयात या मजुरांची व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली त्यानुसार दोनशे ऊसतोड मजुरांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्राचार्य शाम डाके यांनी दिली आहे
सैनिकी विद्यालय बीड येथे माजीमंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या सूचनेवरून २०० कारखान्याच्या लोकांची व्यवस्था सैनिकी शाळेत केली आहे तसेच या लोकांना दैनिक साहित्य तसेच अल्पोपहार चहापाण्याची व्यवस्था तसेच निवास लाईट पाण्याची व्यवस्था केली आहे या प्रसंगी तहसीलदार किरण आंबेकर तसेच उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर सैनिकीचे प्राचार्य डाके एस ए व कर्मचारी उपस्थित होतेवरील व्यवस्था कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आली असून मजुरांना येथे सुरक्षित व निगराणीत ठेवण्यात आले आहे
मुंबई ठाणे पुणे येथे अडकलेल्या बीडकरांना दिलासा
कोरोना विषाणूने राज्यात धुमाकूळ सुरू केल्यानंतर मोठमोठ्या शहरात असणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर होत असतानाच संपूर्ण देशभरात लोक डाऊन जाहीर करण्यात आला अशा परिस्थितीत मुंबई पुणे ठाणे आणि आसपास च्या शहरांमध्ये असणारे बीडचे नागरिक अडकून पडले आहेत,ही बाब माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना माहीत होताच त्यांनी बीडकरांना मदतीचा हात पुढे केला,जे जे नागरिक कंपन्यात काम करत आहेत त्या कंपनीच्या संचालकांना तात्काळ बोलून सर्वांची राहण्याची व घरगुती सामानाची व्यवस्था केल्यामुळे बीडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे . बीडकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे,जयदत्त आण्णामुळे आपल्याला आधार मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.