Home महत्वाची बातमी 70 आर.पेक्षा जास्त लाखो रुपयांची जमीन राष्ट्रीय महामार्गामार्फत सुशिक्षित गुंडांकडून अतिक्रमणाच्या विळख्यात

70 आर.पेक्षा जास्त लाखो रुपयांची जमीन राष्ट्रीय महामार्गामार्फत सुशिक्षित गुंडांकडून अतिक्रमणाच्या विळख्यात

24
0

राष्ट्रीय महामार्गाकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण

प्रतिनिधी:-(रवि आण्णा जाधव)

देऊळगाव मही :-गाव नकाशावर 10.आणे(20 फूट7.5 इंच ) रुंदीचा आहे.सन2015 पूर्वी सदर रस्ता देखभाल व दुरुस्तीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता .सण2008 मध्ये त्यांनी के.टी.कंपनीमार्फत रस्ता दुरुस्तीचे काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी रस्त्याचे बाजुची माझे शेतातील झाडे तोडली.चौकशी केली असता सदर रस्ता20 फूटिऐवजी 80 फूट रुंदीचा करण्यात येणार आहे. त्यापूर्वी जमीन मोजून भूसंपादन कायद्याप्रमाणे जमीन संपादन करणे आहे असे संबंधित अधिकाऱ्याकडून समजले.त्यावेळी त्यांनी रस्ताच्या मध्य भागापासून एका बाजूस अंदाजे 40 फुटापर्यंत जमीन उकरून मुरूम टाकून जमीन पिकास निरुपयोगी केली. मात्र ठेकेदार काम सोडून पळून गेला .रामदास शिंगणे यांनी रस्ता सोडून किती जागेत मुरूम पडला याची मोजणी केली असता 36 आर जमिनीत पडल्याचे समजले.अतिक्रमण करण्यापूर्वी भूसंपादन कायद्याप्रमाणे जमीन संपादन करणे जरुरीचे होते तसे करण्यात आलेले नाही.
रामदास शिंगणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास आपण20 फुटाचा रस्ता 80 फूट करतांना माझी 60 फूट जमीन कशी संपादन केली याबद्दल विचारणा केली असता त्यांचेकडे जमीन संपादनाची कोणतीही माहिती नाही अशी लेखी त्यांनी रामदास शिंगणे यांना दि.25/02/2014रोजी दिली. मी माझी जमीन संपादीत केल्याबद्दल भूसंपादन अधिकारी सिंदखेडराजा यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी रामदास शिंगणे यांची जमीन संपादन केली नाही व कायदेशीर मार्गाने जमीन संपादन केल्याशिवाय जमिनीवर कोणतेही काम येणार नाही अशी लेखी दि.03/03/2015 रोजी त्यांनी दिली. रस्ता रुंदीकरण करण्याकरिता जमीन संपादनाकरीता मोजणीबाबत कोणत्याही खात्याकडून प्रस्ताव आलेला नाही अशी लेखी भूमी अभिलेख कार्यालयाकडून दि.25/06/2018 रोजी देण्यात आली आहे.
माझेकडून महसूल खात्याने 2.74 हे.आर.चा शेतसारा 77+11=88रुपये वसूल केल्याची लेखी मला दि.03/12/2018 रोजी तलाठी दे.मही यांनी दिलेली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांचे ठेकेदारामार्फत रामदास शिंगणे यांच्या शेतात रस्ताच्या मध्यापासून 65 फुटाचे वर पर्यंत खोदकाम करून गिट्टी व मुरूम टाकून शेतकऱ्याचे तुर पिकाचे अंदाजे 6000 रुपयाचे व15 कलमीकरण केलेल्या आंब्याच्या झाडांचे रात्रीच्या वेळी दि.21/01/2019 रोजी नुकसान केले

रामदास पाटीलबा शिंगणे (वय वर्ष 75) (से.नि.कृ.स.) मु.पो.देऊळगाव मही ता.देऊळगाव राजा जि.बुलडाणा
बुलडाणा जिल्हामधून समृद्धि हाईवे चे काम सुरु आहे शेतकऱ्यांच्या जमीनी शासकीय दरापेक्षा पाच पट जास्त मोबदला देऊन भुसंपदान करून कायदेशिर मार्गाने सुरु आहे.मात्र चिखली-देऊळगांव राजा राष्ट्रीय महामार्ग क्र. 753A चे रुंधिकरणाच्या कामा करीता माझे मौजे देऊळगांव मही सर्वे नं. 67/1 मधील जमीन कायदेशीर मार्गाने भुसंपादन न करता संबंधित अधिकारी त्यांचे ठेकेदारा मार्फत मी सदर बेकायदेशीर कामास विरोध करू नये म्हणून मला मार हान करने, जीवे मारण्याच्या धमक्या देने, खोटे रिपोर्ट देऊन पोलीसा मार्फत खोटे गुन्हे दाखल करने ई.हुकुमशाही मार्गाचा अवलंब करत आहे.
कायदेशीर मार्गाने माझी जमीन संपादन केल्या शिवाय माझे जमिनीवर कोणतेही बेकायदेशीर काम करू नये,असे अर्ज मी यापूर्वी मा.जिल्हाधिकारी यांना दि.28-05-2018 व दि.21-02-2020 रोजी देऊन त्याच्या प्रति सर्व संबंधित मा.सर्व पदाधिकारी व अधिकारी यांना
दिलेल्या आहे.

अन्यायग्रस्त शेतकऱ्यास न्याय दिलास कोरोना ग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यक निधी देऊ.
सदर प्रकरणाची संपूर्ण कायदेशीर कागदपत्रे व मोक्कापाहणी करुन शासनामार्फत चौकशी व्हावी माझी बाजू योग्य असल्यास माझी जमीन भुसंपादन कायद्याप्रमाणे संपादन करून समृद्धी हाईवे च्या दराने मला मोबदला दिल्यास त्यामधुन मी 5,00,000 लाख रु.कोरोना ग्रस्तांच्या मदतीकरिता मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधिस देण्यास तयार आहे.कृपया संबंधित अधिकाऱ्यांना कायद्याचे पालन करण्याचे आदेश देऊन मला देशसेवेचि संधी दयावी ही शासनास नम्र विनंती..( रामदास पाटीलबा शिंगणे आपला स्वतंत्र भार तातील अन्यायग्रस्त शेतकरी नागरिक )