Home मराठवाडा असाही एक अधिकारी , ??? स्वतःच्या शेतात पिकवलेला सर्व अन्न धान्य मुख्यधिकारी...

असाही एक अधिकारी , ??? स्वतःच्या शेतात पिकवलेला सर्व अन्न धान्य मुख्यधिकारी यांनी दिला गरिबांना ,

85
0

गरीब गरजवंतांनी मानले आभार ,

अँड ताज अहेमद अन्सारी

बीड , गेवराई

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत उत्तमराव बिघोत यांनी गावाकडे वडिलांना फोन करून आपल्या शेतातील आत्ताच जेवढा गहू काढला आहे तो गरजवंताला देणे गरजेचे आहे असे सांगितले असता वडिलांनी लगेच होकार दिला. जवळपास १५ क्विंटल गहु गेवराई येथे पोहच करण्यात आला. आणि गेवराई नगर पालिकेचे मुख्याधिकारी बिघोत यांनी शहरातील १०० लोकांना गहु, साखर, तेल, तांदूळ असे वैयक्तिक मदत गरजवंताला केली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेवराई शहरासह राज्यात लाँकडाऊन सुरु आहे. दरम्यान लाँकडाऊन मुळे गेवराई गोरगरीब व हातावर पोट भरत असलेल्या लोकांना घरात बसावे तर खाण्याची भ्रांत निर्माण झाली आहे. आणि बाहेर पडणे शक्य नाही. अशा परिस्थितीत गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी शहरातील गरजु लोकांना स्वतः च्या शेतात पिकवलेला व नुकताच काढलेला १५ क्विंटल गहु व किराणा सामान जवळपास १०० लोकांना देण्यात आले आहे.
मागील वर्षी सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती यावेळी तेथील नागरिकांना मदत म्हणून १ लाख ३७ हजार रुपयांची मदत न.प.ने िदली होती. दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर ही नगर परिषदेच्या वतीने सर्व कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साह्यता निधी जमा करण्यात येणार असल्याचे सीअाे बिघोत यांनी सांगितले. गेवराई नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर यांच्या माध्यमातून गेवराई शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून कुठल्याही प्रकारच्या आपत्ती मध्ये नगर परिषद तयार असून आतापर्यंत नागरिकांनी जसा संयम पाळला असे अावाहन मुख्यशधिकारी भागवत बिघोत यांनी सांगितले.