Home मुंबई कोरोना : वाहन चालकांना आर्थिक मदत द्या – संजय हाळनोर

कोरोना : वाहन चालकांना आर्थिक मदत द्या – संजय हाळनोर

113
0

मुंबई / संभाजीनगर. (विशेष प्रतिनिधी) – कोरोना विषाणू मुळे संपूर्ण देशात, राज्य लॉकडाऊन असल्यामुळे राज्यातील लाखो वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आहे अशा सर्व वाहन चालकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी जय संघर्ष वाहन चालक संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष संजय हाळनोर यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या कडे ईमेल द्वारे केली आहे.

यावेळी हाळनोर म्हणाले की, वाहन चालक असेल तर जग चालत, देशात चालतो, राज्य चालतो, तसेच पंतप्रधानांपासून ते तहसीलदार पर्यंत या सर्वांची वाहने हे वाहन चालक चालवत असतो. त्याच बरोबर ट्रान्सपोर्ट, प्रवासी वाहतूक, तसेच अशा अनेक खाजगी वाहनावर वाहन चालक अतिशय मुबलक वेतनात काम करत असतो. तसेच ट्रॅकटर पासून ते ट्रक व रिक्षा पासून ते बस पर्यंत दुसऱ्याची वाहने चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वाहन चालकाला ₹ 5500 ते ₹ 6000 रुपये मासिक मानधन व ₹ 200 रुपये भत्ता मिळतो. परंतू, सद्य परिस्थिती काम बंद तर पगार बंद, भत्ता बंद त्यामुळे वाहन चालक व त्यांच्या कुटुंबावर उपास मारीची वेळ आली आहे. सोयगाव तहसील कन्नड आमदार राजपूत व औरंगाबाद येथील मुख्यमंत्री कार्यालयास दि. 19/03/2020 रोजी निवेदन देऊन काहीच परिणाम दिसून आला नसल्यामुळे परत दि. 30/03/2020 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद तसेच जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्यासोबत चर्चा करून निवेदन देण्यात आलेले आहे. आता थेट मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्या कडे आम्ही मागणी केली आहे.

वाहन चालकांना असंघटित कामगारा मध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीचा मागील तीन वर्षापासुन आम्ही पाठपुरावा करत आहोत. त्यासाठी अनेक निवेदन दिले गेले. नंतर दि. 13 सप्टेंबर 2019 ते दि.17 सप्टेंबर 2019 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद समोर आमरण उपोषण केले. त्यावेळी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आश्वासन देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली होती. त्या नंतर हिवाळी अधिवेशन नागपुर येथे दि. 19/12/2019 रोजी आम्ही भव्य मोर्चा काढला होता व तेव्हा मंत्री सुभाष देसाई यांना निवेदन दिले होते. तेव्हा देसाई हे परिवहन मंत्री होते. आता या वाहन चालकांना कोणी मदत करेल का मदत असे जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संजय हाळनोर यांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे.