Home महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर यांच्याकडून प्रत्येकी...

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९’ पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर यांच्याकडून प्रत्येकी ५० लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द

165

नांदेड , दि. १ – ( राजेश भांगे )- आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात “कोव्हिड १९” संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी तातडीच्या उपाय योजना म्हणून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी ५० लाख रुपयाचा धनादेश तसेच आमदार अमर राजुरकर यांनी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात समान स्वरुपात वाटप करण्यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
माहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाख रुपये
माहूरगड येथील श्री दत्तात्रय संस्थान शिखरचे अध्यक्ष तथा महंत मधुसूदन भारती गुरु अचूत भारती व विश्वस्त मंडळाच्यावतीने ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला
कोविड १९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-१९ हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक ३९२३९५९१७२० आहे.
सढळ हाताने मदत करा
उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन केले आहे.
खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९,बँकेचे बचत खाते क्रमांक- ३९२३९५९१७२०,स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई ४०००२३,शाखा कोड ००३००,आयएफएससी कोड SBIN००००३००
सदर देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (G) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येते.