Home मराठवाडा बदनापूर नगर पंचायत उपाध्यक्ष शेख युनूस लालमिया यांनी स्वतःच्या खर्चाने प्रभाग 16...

बदनापूर नगर पंचायत उपाध्यक्ष शेख युनूस लालमिया यांनी स्वतःच्या खर्चाने प्रभाग 16 मध्ये केले अन्न धान्य वितरण ,

34
0

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी
कोरोना रोगामुळे लॉक डाऊन करण्यात आल्याने दररोज मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून हाताला काम नसल्यामुळे पैसा नसल्याने अन्न धान्य कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाल्याने बदनापूर नगर पंचायत उपाध्यक्ष शेख युनूस लालमिया यांनी स्वतःच्या खर्चाने प्रभाग 16 मध्ये 11 किवीनटल गहू गोर गरिबांना वाटप केल्याने दिलासा मिळाला आहे
सध्या कोरोना रोगामुळे महाराष्ट्र लॉक डाऊन करण्यात आलेले असल्यामुळे सर्व आस्थपणा बंद करण्यात आलेले आहे त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न निघण्याचे सूचना प्रशासन करीत आहे तर या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून शेतकऱयांनी,व इतर व्यवसायाधारकांनी देखील काम बंद केल्याने मजुरांच्या हाताला काम राहिलेले नाही त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे
सध्याची परिस्थिती लक्षात घेता दररोज मोल मजुरी करून कटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या लोकांचे अतोनात हाल होत असून काम नसल्यामुळे पैसे नसल्याने धान्य आणायचे कसे असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे या गंभीर परिस्थितीत त्यांना शासनाने मदत करणे अपेक्षित आहे मात्र तसे होतांना दिसत नाही
बदनापूर शहरातील प्रभाग 16 मध्ये दररोज मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागविणारे 140 कुटुंब असून त्यांचे हाल होत असल्याने मसनुसकीच्या नात्याने उपनगराध्यक्ष शेख युनूस लालमिया यांनी 11 किवनटल गहू प्रत्येकी कुटुंब 5 किलो असे वाटप केल्याने गोर गरिबांना दिलासा मिळाला आहे

Unlimited Reseller Hosting