July 4, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

डॉक्टर हजर नसल्यामुळे गेला त्याचा जीव , ???

ग्रामीण रुग्णालयातिल बेपत्ता डॉक्टर वर कार्यवाही करण्यात यावी ,

आसेगावच्या युवकाचा ह्रदयविकाराने मृत्यू…..

देवानंद खिरकर := आसेगाव बाजार येथिल राजेश देवीदास धांडे या युवकास ह्रदय विकराचा तिव्र धक्का बसला.कुटुंबीयाने धांडे या युवकास तातडीने अकोट येथिल ग्रामीण रुग्णालयात हलविले मात्र रुग्णालयात एकही डॉक्टर हजर नसल्याने या युवकास आपला प्राण गमवावा लागला.राजेश धांडे या शेतमजुरास मंगळवारी सकाळी आपल्या राहत्या घरी ह्रदयविकाराचा तिव्र धक्का बसला.धांडे यांना त्यांच्या कुटुंबीयांंनी तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र येथे कर्त्यव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवल ह्या हजर नसल्याने धांडे यांच्यावर वेळेवर उपचार झाले नाहीत.त्यामूळे आमच्या रूग्णाला जीवाने जावे लागले.असा आरोप कुटुंबीयाने केला आहे.जगभरात कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराचा हाहाकार असतांना लाख लोकसंख्येच्या व आदीवाशी बहुल भागाशी जोडणार्या प्राथमीक आरोग्य केंन्द्रात कर्तव्यावर असलेले वैद्यकिय अधिकारी हजर नसने ही बाब अत्यंत गंभीर आहे.मात्र या प्रकारवर लोकप्रतिनिधिचा अंकुश नसल्याने हा प्रकार दिवसेंदिवस वाढीस लागला आहे.धक्का दायक प्रकार म्हणजे प्राथमीक आरोग्य केंन्द्रात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर शिवल व डॉक्टर रेड्डी हजर नसल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर पवार यांनी धांडे कुटुंबांना लेखी दिले.त्यांच्यावर हा अचानकपणे दुखाचा डोंगर कोसळल्याने त्यांनी तक्रार न करता शवविच्छेदनानंतर आपल्या आसेगावी मृतकावर अंत्यसंस्कार केले.हजर नसलेल्या डॉक्टरांवर कोणती कारवाई होते.याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!