Home महत्वाची बातमी होळीचागाव ग्रामपंचायतीचा आनोखा उपक्रम , कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायकल वरून जनजागृती

होळीचागाव ग्रामपंचायतीचा आनोखा उपक्रम , कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सायकल वरून जनजागृती

678

मायणी ता. खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे) – संपूर्ण देशामध्ये वेगाने व्हायरल होत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश पातळीवरून राज्य पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत तसेच शहरी भागातील लोकांची खेड्याकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे गावातील ग्रामपंचायत चे काम वाढल्याचे दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या मार्फत विविध योजना राबवून कोरानाचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहेत
यातच होळीच्या गाव येथील ग्रामपंचायत मार्फत जनजागृती करण्यासाठी सायकलवर स्पीकर ठेवून जनजागृतीचे काम करण्याचे सुरु केले आहे यामध्ये गावातील ग्रामपंचायत मधील शिपाई सायकलवर छोटा स्पीकर ठेवून संपूर्ण गावामध्ये फेरी मारून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे यावेळी या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात येत आहे की घाबरून जाऊ नये याची काळजी घ्यावी जे लोक आले आहेत त्यांनी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी तसेच गावातील लोकांना सहकार्य करावे विनाकारण गर्दी करून थांबू नये घरांमध्ये रहावे अशा प्रकारचे आव्हान ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.