Home मराठवाडा हलगर्जीपणाआष्टीच्या बाजार तळावर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा,

हलगर्जीपणाआष्टीच्या बाजार तळावर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा,

231

फिरणाऱ्यांवर आता ड्रोनची नजर; गेवराई-धारूर, माजलगावात २३८ कामगार ‘होम क्वाॅरंटाइन’

अँड शेख ताज अहेमद अन्सारी

बीड

काेरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे। बीड शहरात सार्वजनिक ठिकाणी धूर फवारणीसाठी पाच फॉगिंग मशीन दाखल झाल्या असून फवारणी सुरू झाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातून जिल्ह्यात आलेल्या धारूरसह गेवराई व माजलगाव तालुक्यातील २३८ ऊसतोड मजुरांना खबरदारीचा उपाय म्हणून १४ दिवस क्वाॅरंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे। आष्टीच्या बाजार तळावर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी उसळल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला त्यामुळे साडेनऊ ऐवजी आठ वाजताच बाजार बंद करण्यात आला होता। जिल्ह्यात संचारबंदी दरम्यान विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यावर लोकांवर नजर ठेवण्यासाठी महत्त्वाच्या शहरात ड्रोन कॅमेरे फिरवण्यात येत अाहे। संचारबंदी दरम्यान फिरणाऱ्या लोकांवर ड्रोन फुटेजचा वापर करून पोलिस कारवाई केली जाणार आहे। सोमवारी जिल्ह्यातील बीडसह केज, अंबाजोगाई शहरात ड्रोन फिरवण्यात आले। तर माजलगाव व गेवराई मंगळवारपासून ड्रोनची जर राहणार आहे। दुसरीकडे आष्टी – येथील नगर पंचायतने ३१ मार्चपासून पुढील आदेश देईपर्यंत शहरातील सर्व किराणा दुकाने बंदचा निर्णय घेत व्यापाऱ्यांना पत्र दिले होते। हा निर्णय सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नगर पंचायतीची कान उघडणी केल्याने नगरपंचायतने सुधारित पत्र काढून दुकाने नियोजित वेळेत सुरू राहतील, असा आदेश काढला आहे।
जिल्हाधिकाऱ्यांनी कानउघाडणी, आष्टी नगरपंचायत ताळ्यावर
४० ऊसतोड कामगारांना ठेवले एका शाळेत
माजलगाव । सांगली जिल्ह्यातील हंगाम संपवून परत आलेले ४० ऊसतोड कामगार माजलगाव शहरातील एका शाळेत होम क्वाॅरंटाइन म्हणून ठेवण्यात आले आहे। सोमवारी हातावर शिक्के असलेला एक व्यक्ती रस्त्यावर फिरत असताना पोलिसांनी त्याची थेट घरी रवानगी केली। सोमवारी पहाटे तीन वाजता एका ट्रॅक्टरमध्ये ऊसतोड कामगार माजलगाव शहरात दाखल झाले असता त्यांना परभणी फाटीवर अडवून त्यांची तपासणी करण्यात आली। असता त्यांच्यावार हातावर शिक्के दिसून आले। या सर्व लोकांना तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या आदेशानुसार शहराबाहेरील एका शाळेत निगराणी खाली ठेवण्यात आले आहे। त्यांची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ। अनिल परदेशी यांनी दिली।
शिरूरमध्ये शिस्तीचे दर्शन, रस्त्यावरच भरला बाजार
शिरूर – ना आरडाओरड ना खरेदीसाठी घाई गडबड केवळ एका शिस्तीत सोमवारी शिरूर येथील बाजारात नागरिक दिसून आले। सोमवारी शिरूर येथील बाजार बंद ठेवण्यात आला असला तरी मात्र, सकाळी आपला भाजीपाला विक्री करण्यासाठी खेड्यातील आलेले शेतकरी रस्त्यावर दूर दूर बसले होते। विशेष म्हणजे भाजीपाला खरेदी कारणाऱ्या व्यक्तीस ते भाजी पाल्यास हातही लावू देत नव्हते। सर्व विक्रेत्यांनी आपल्या तोंडास मास्क व रुमाल बांधलेला होता। खरेदीस आलेल्या लोकांनी देखील शिस्त पाळली कोणीही गर्दीने खरेदी केली नाही।
पाच शहरांत ड्रोन कॅमेरे
बीड जिल्ह्यातील बीड, केज, माजलगाव, अंबाजोगाई व गेवराई या प्रमुख शहरात ड्रोनद्वारे वाॅच ठेवला जात आहे। सर्वच तालुक्याच्या ठिकाणांना आवश्यकता असेल तर ड्रोन किरायाने घेऊन वापरण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। बीड पोलिसांकडे स्वतःचे केवळ २ ड्रोन असून ते बीड शहरात वापरले जात आहेत। इतर ठिकाणी उपलब्धतेनुसार व आवश्यकतेनुसार ड्रोन वापरासाठी सूचना आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक पारवे यांनी दिली।
अंबाजाेगाईतही ड्रोनची करडी नजर, नागरिकांनो फिरू नका
अंबाजोगाई : शहरातही संचारबंदी दरम्यान मोकाट फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे। सोमवारी ड्रोनने शहरातील मुख्य रस्त्यावरचे व अनेक गल्लीबोळातील छायाचित्र व व्हिडिओ घेण्यात आले। विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे।
ऊसतोड मजुरांना धारूर येथील आरोग्य विभागाने होम क्वाॅरंटाइन केले आहे।
केज शहर ड्रोन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली
केज- संचारबंदी दरम्यान केज शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केला आहे। शहरातील बहुतांश भागात सोमवारी ड्रोन कॅमेरा फिरवून संपूर्ण शहरच निगराणीखाली आणण्यात आले। ड्रोन कॅमेऱ्यात ज्या भागातील रस्त्यावर फिरणारे लोक आढळून येतील। त्या भागात वेळीच पोलिस पाठवून त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे। ड्रोनच्या मदतीने मोकाटपणे फिरणाऱ्यांवर वॉच ठेवला जात असल्याने फिरणारे लोक हे पोलिसांच्या तावडीत सापडणार आहेत।
माजलगाव, गेवराईत आजपासून ड्रोनची नजर
माजलगाव : माजलगाव शहरात बाहेर फिरणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी मंगळवारपासून शहरात ड्रोन कॅमेरे फिरवण्यात येणार अाहे। मोकाट फिरणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी दिली। आझादनगर, गौतम नगर,भीमनगर, हनुमान चौकामधील लोक विनाकारण बाहेर पडत आहेत।
१२ ऊसतोड मजूर १४ दिवस निगराणीखाली
गेवराई । तालुक्यातील कोळगाव व गाढेवाडी येथे पश्चिम महाराष्ट्रातून १२ ऊसतोड मजूर गावी परतले असून याची माहिती मिळताच कोळगावचे सरपंच अॅड। उद्धव रासकर, तलाठी डी। ए। शेळके यांनी या मजुरांना तुम्ही क्वाॅरंटाइनमध्ये रहा, अशी विनंती केली, मात्र यासाठी या मजुरांनी स्पष्ट नकार दिला। यानंसतर ही माहिती उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, गटविकास अधिकारी के। एम।बागुल, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांना दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कोळगाव येथे तत्काळ दाखल झाली। रविवारी सायंकाळी सहा वाजता कोळगाव येथे विलगीकरण कक्षात १२ ऊसतोड मजुरांना ठेवण्यात आले आहे। या मजुरांना १४ दिवस याठिकाणी प्रशासकीय अधिकारी यांच्या निगराणीखाली ठेवून त्यांची जेवणाची व्यवस्था केली आहे।
आष्टी : येथील नगर पंचायतने ३१ मार्चपासून पुढील आदेश देईपर्यंत शहरातील सर्व किराणा दुकाने बंद राहणार असल्याचे पत्र व्यापाऱ्यांना दिले होते हा निर्णय सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नगर पंचायतीची कान उघडणी केल्याने नगर पंचायतने सुधारीत पत्र काढून दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। किराणा मालासाठी शहरातील नागरिक गर्दी करत असून सोशल डिस्टन्सिंग सुद्धा पाळत नाहीत। त्यामुळे ३१ मार्च पासून पुढील आदेश देईपर्यंत किराणा दुकाने बंद राहतील, असे मुख्याधिकाऱ्यांनी पत्र दिले होते।
१८६ कामगार होम क्वाॅरंटाइन
धारूर । सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून अशातच या भागातून मजुरांचे लोंढे गावाकडे परतत आहेत। खामगाव – पंढरपूर या मार्गावरून परत येणाऱ्या मजुरांची पोलिसांनी धारूर येथे अडवून त्यांना आरोग्य तपासणी करण्याची सक्ती करण्यात आली होती । सदरील मजूर हे धारूर, वडवणी, माजलगाव तालुक्यातील असून धारूर रुग्णालयात एका दिवसात १८६ मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्के मारून त्यांना होम क्वाॅरंटाइन केले।
केज शहरात फिरणाऱ्या लोकांवर वॉच ठेवण्यासाठी अशा प्रकारे ड्रोनने छायाचित्र घेतली जात आहे