Home महत्वाची बातमी करोना विषाणूची भीती असतांना देखील  वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना विमा कवच द्या...

करोना विषाणूची भीती असतांना देखील  वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांना विमा कवच द्या , मा , खासदार , सुप्रिया सुळे

29
0

अमीन शाह

मुंबई- कोरोनाच्या विरोधात अहोरात्र परिश्रम करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना सरकारकडून विमाकवच देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पत्रकार, फोटोग्राफर आणि कॅमेरामॅन यांनाही विमाकवच मिळावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक ट्विट करून केली आहे.

खासदार सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की सरकार व समाज यांच्यात दुवा म्हणून पत्रकार व सहकारी सध्या कोरोना विषाणूची भीती असतानादेखील कार्यरत आहेत. त्यांचाही अनेकांशी संपर्क येतो, यामुळे त्यांना विमाकवच मिळावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्विटवरून केली आहे.
हेही