Home मराठवाडा कोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम – जिल्हाधिकारी...

कोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

202

नांदेड , दि.३१ – ( राजेश भांगे ):- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्या साठी प्रतिबंधात्मसक उपायोजना करण्यासाठी विविध विषयानुसार ३१ मार्च २०२० पर्यंत घालण्यात आलेले निर्बंध (बंदी) पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
साथरोग प्रतिबंधात्म्क कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार अधिसुचनेनुसार प्रादुर्भाव रोखण्याटसाठी ज्या् उपायोजना करणे आवश्य्क आहे, त्याम करण्या साठी सक्षम प्राधिकारी म्हणणून जिल्हाधिकारी यांना घोषित केले आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह यातील नमुद विषय निहाय बाबींवर ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेशित करण्यात आले होते. नांदेड जिल्हयात फौजदारी संहिता दंडप्रकियेचे कलम १४४ अन्वमये प्रतिबंधात्मंक आदेश पारीत करण्यायत आला आहे. पुढील बाबींनुसार ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्यात आलेले आदेश पुढील आदेशा पर्यंत कायम राहतील.
जिल्ह्यात बंद ठेवण्यात पुढील बाबींचा समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थाण, खाजगी शिकवणी, अभ्यायसिका केंद्र, शहरी हद्दी लगतच्यां शैक्षणिक संस्था, जिल्हणयातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था , महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडया, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, नाटयगृह, म्युझियम, शॉपिंग मॉल, आठवडी बाजार, जिल्ह यातील ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाडया, आधार केंद्र, सर्व बॅंकातून अनुदान व पिक विमा वाटप, सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तणनोंदणीची काम यांचा या बंदमध्ये समावेश आहे. तर कार्यालयातील बैठका व अभ्यांयगतांच्याय भेटी नियंत्रित राहतील.
यापूर्वी नांदेड जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, परिपत्रके हे या आदेशासह अमंलात राहतील. या आदेशाचे उल्लं घन केल्यातस संबंधिताविरुध्दा भारतीय दंडसंहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.