Home जळगाव मनियार बिरादरी तर्फे अन्नधान्य वाटप पैकेज घोषित केल्या बद्दल शासनाचे आभार

मनियार बिरादरी तर्फे अन्नधान्य वाटप पैकेज घोषित केल्या बद्दल शासनाचे आभार

252

रावेर (शरीफ शेख)

संचार बंदी मुळे हात मजूर,कामगार,रिक्शा चालक यांना आपले रोजचे कार्य मिळत नसल्याने मनियार बिरादरी जळगाव तर्फे कोळी पेठ, मन्यार वाडा, खाटीक वाडा, जोशी पेठ, जैनाबाद ज़ोपडपट्टी या भागातील सर्वे करून जे खरोखरच गरजवंत आहे अशा लोकांची यादी तयार करून त्यांना दहा किलो गव्हाचे पिठ, पाच किलो तांदूळ, तीन किलो तूर डाळ , दोन किलो गोडेतेल व चहा पत्ती वाटप करण्यात आली शुक्रवार नमाज पूर्वी सदरचे वाटप हे मन्यार वाडा येथील जामा मजीद शेजारी सय्यद चाँद सय्यद अमीर यांच्या घरी वाटप करण्यात आले त्यावेळी बिरादरी च्या महिला विभागाच्या प्रमुख जुबेदा बी सय्यद चाँद तसेच अध्यक्ष फारुक शेख, बिरादरीचे अब्दुल रऊफ रहीम , सय्यद चाँद, सलीम मोहम्मद , तय्यब शेख यांची उपस्थिती होती.

*प्राथना करण्याची विनंती व शासनाचे आभार*
शासनाने गरीब व शेतकरी यांच्या साठी तसेच इतर सुविधा घोषित केल्या बद्दल प्रथम शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.

अन्नधान्य वाटप करताना घेणाऱ्यांना फक्त एक विनंती केली जात होती की अल्लाकडे प्रार्थना करा की विश्व व भारतात आलेले हे कोरोना व्हायरस पासून सर्वांचे रक्षण करो व हा आजार लवकरात लवकर या भूमीतून जाओ अशी प्राथना करण्याचे सांगण्यात आले.
सदरचे वाटप रोज करण्यात येणार असून परिसरा प्रमाणे संबंधितांची नियुक्ती केली असून त्या त्या परिसरातील गरजवंतांना हे धान्य पुरवण्यात येईल असे आश्वासन फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.
आज झालेले काही प्रातिनिधिक स्वरूपात तिल नावे खालील प्रमाणे रानी युवराज सोनवणे ( जैनाबाद झोपडपट्टी),नसरीन बी शेख ईसा व ,भीका शेख करीम सिकलगर( रिधुर वाड़ा),राबिया बी शेख लाल (खटिक वाडा) यांना देण्यात आले.
सदर चे किट जळगाव शहरातील वेगवेगळे संघटना करीत असून सुमारे एक हजार किट या संघटना वाटनार आहेत.