Home मराठवाडा बंद असतांनाही जुगार सुरू 8 जुगारींना अटक ,

बंद असतांनाही जुगार सुरू 8 जुगारींना अटक ,

448

61 हजार 850 रुपये चा माल जप्त ,

सय्यद नजाकत

बदनापूर/प्रतिनिधी

जिल्हादंडाधिकारी जमावबंदी आदेश आणि जनता संचारबंदी असतांना देखील जुगाऱ्यानी आदेशाला न जुमानता एकत्रित येऊन जुगार खेळत असताना पोलिसांनी 8 जणांना रंगेहाथ पकडून 61 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल रोषणगाव येथे जप्त केला

कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून रविवारी जनता संचारबंदी होती त्याच बरोबर जमावबंदी आदेश होता तरी देखील काही मंडळी सर्रास आदेशाचे उल्लंघन करीत आहे ,रविवारी दुपारी ३.४५ बबदनापूर तालुक्यातील रोषणगाव इदगाह जवळ सार्वजनिक ठिकाणी झन्ना मन्ना नावाचा जुगार काही मंडळी खेळत असलंयाची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांना मिळाली असता त्यांनी तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविले यावेळी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना काही जण दिसले परंतु पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी समाधान जनार्धन घंटे , शेख कमरोद्दीन शेख नजीर , ईसा मुसा कुरेशी , मुनीर लाला पठाण , शब्बीर लाला पठाण , कृष्णा बाबुराव गुरखे , योगेश गणेश कोलते , गोरख सोमीनाथ सतपुते सर्व रा.रोषणगाव या आठ जणांना धरले

मिळून आलेलय आरोपीच्या ताब्यातून रोख १८५० रुपये व चार मोटारसायकल क्रमांक एम एच २१ झेड ९५९७ पॕशेनप्रो , एम एच २१ बि जे ०८४२ स्पेल्डंर , एम एच २१ए डब्लु ७३९० पॕशेनप्रो , व एक विना पासींग विना नंबर ची ज्याची अंदाजे किंमत ६० हजार रुपये असा एकूण ६१ हजार ८५० रुपये जप्त करुन फिर्यादी सह्याक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद वनारसे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपी विरुध्द जुगार कायद्या विरुध्द गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो.हे, काॕ.राठोड करीत असल्याचे ठाणे अमलदार यांनी सांगीतले .