Home मराठवाडा औरंगाबाद शहरातील फोटोग्राफर राहुल कोठुळे व माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे शहरातील विविध...

औरंगाबाद शहरातील फोटोग्राफर राहुल कोठुळे व माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे शहरातील विविध ठिकाणी जाऊन मास्क व अन्नदानाचे चे वाटप

198
0

अब्दुल कय्युम

औरंगाबाद ,

संपुर्ण जगात सध्या कोरोना ह्या रोगाची साथ चालु आहे ह्या रोगाची साथ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे त्या संदर्भात केंद्र सरकार सह राज्य सरकार हि सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत त्यातच औरंगाबाद शहरातील माणुसकी गृप चे सदस्य फोटोग्राफर राहुल कोठुळे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यानी आपण समाजाच काही देण लागत ह्या भावनेतून शहरातील घाटी हॉस्पिटल,कॅन्सर हॉस्पिटल,भाजीमंडई, पेट्रोल पंप,तसेच रस्त्यावरील गरीब लोकांपर्यंत साधारण २००० मास्क व फळे,मेडिकल साहित्य चे वाटप केले आहे.

देशभरात आलेल्या ह्या कोरोना च्या संकटात गरजवंताला फुल न फुलाची पाकळी म्हणून राहुल सह त्याच्या मित्रांनी मदत केली आहे

ह्या कार्यासाठी राहुल कोठुळे, प्रेम माकुडे,कुलदीप जोशी,जीवन वैष्णव,महेश वाघ ह्यांच्यासह समाजसेवक सुमित पंडित,लक्ष्मण बोर्डे, आतिश साळवे अनिल लुनीया ह्यांनीही मदत केली आहे